Monday, July 1, 2024

आदित्य नारायणने केला मुलीच्या नावाचा खुलासा, इन्स्टा पोस्टद्वारे दिली माहिती

गायक आणि होस्ट आदित्य नारायण नुकताच एका छोट्या परीचा बाबा झाला आहे. तो श्वेता अग्रवालसोबत पालकत्वाचा हा काळ एन्जॉय करत आहे. श्वेताने २४ फेब्रुवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण या जोडप्याने ४ मार्चला ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. चाहत्यांसाठी आणि आदित्यच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा काळ आहे. या जगात आलेल्या छोट्या परीला प्रत्येकजण प्रेम देत आहे. दरम्यान, आदित्यच्या मुलीचे नाव जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. यासोबतच ते सिंगरकडून त्याच्या फोटोचीही मागणी करत आहे. चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत आदित्यने मुलीच्या नावाची घोषणा केली आहे.

आदित्यने सांगितले मुलीचे नाव 

आदित्यने ( Aditya Narayan) सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान एका चाहत्याने त्याला मुलीचे नाव सांगण्यास सांगितले. आढेवेढे न घेता आदित्यने मुलीचे नाव सांगितले. त्याने आपल्या मुलीचे नाव त्वषा नारायण झा ठेवले आहे. यासोबतच आदित्यने सांगितले की, तो इंटरनेटवर मुलीसाठी चांगले नाव शोधत होता, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलाचे नाव शोधत होते. आदित्यने लिहिले की, “संपूर्ण कुटुंबात मी एकमेव व्यक्ती होतो जो मुलीसाठी नाव शोधत होतो. तर सर्वजण मुलासाठी नाव शोधत होते.”

चाहत्यांना आनंदाची बातमी देताना आदित्य नारायणने लिहिले की, “मला आनंदाने सांगायचे आहे की देवाने आम्हाला मुलगी दिली आहे. आम्ही सर्वांनी २४ फेब्रुवारीला तिचे स्वागत केले.” एका मुलाखतीत आदित्यने सांगितले होते की, त्याला मुलगी हवी होती. तो म्हणाला की, “सगळे मला सांगत होते की हा मुलगा असेल. पण गुप्तपणे मला फक्त एक मुलगी हवी होती. मला वाटते की, वडील मुलीच्या खूप जवळ असतात. मुलगी जन्माला आल्याने मला खूप आनंद झाला आहे. श्वेता आणि मी आई-वडील झाल्याचा खूप आनंद होतो. श्वेताची प्रसूती झाली तेव्हा मी तिच्यासोबत होतो.”

आदित्य पुढे म्हणाला होता की, “माझा विश्वास आहे की, जगात मूल आणण्याची ताकद फक्त स्त्रीमध्ये आहे. माझा श्वेताबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित झाले आहे. मुलाला जन्म देण्यासाठी आईला खूप कठीण प्रसंगातून जावे लागते.” आदित्यने सांगितले की, प्रत्येकजण त्याच्या घरी मुलगी झाल्यामुळे खूप आनंदी आहे. त्याचे वडील आदित्य नारायण आनंदाने डोलत आहेत. नवजात बाळाला ते पुन्हा पुन्हा पाहत राहतात. ते मुलीला एंजेल म्हणतात.

श्वेता आणि आदित्यने २०१० मध्ये ‘शपित’मध्ये एकत्र काम केले होते. १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे लग्न झाले. या लग्नाला दोघांचे फक्त कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. आता दोघेही त्यांच्या पहिल्या मुलीचे जोरदार स्वागत करत आहेत.

हे देखील वाचा