Wednesday, July 3, 2024

बाप्पाच्या आगमनापूर्वी अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रदर्शित; होतंय जोरदार कौतुक

विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. तसेच मनोरंजन क्षेत्राशी देखील त्या खूप जोडलेल्या असतात. खास करून त्यांना गायनाची खूप आवड आहे. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देतात. अशातच त्यांचे एक नवीन गाणे समोर आले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला अगदी काहीच दिवस उरले आहेत. अशातच यानिमित्ताने त्यांनी ‘गणेश वंदना’ हे गाणे गायले आहे. त्यांच्या या गाण्यावर आता सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याचे नाव ‘गणेश वंदना’ हे आहे. या गाण्यातून त्यांनी एक सामाजिक संदेश देखील दिला आहे. भक्तीचे दुसरे नाव सेवा हा संदेश त्यांच्या या गाण्यातून देण्यात आला आहे. त्यांच्या या नवीन अर्थपूर्ण गाण्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. (singer amruta fadanvis new song release on You tube)

या गाण्यात तुम्ही पाहू पाहू शकता की, कुटुंबात बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू असते. घरात ही सगळी तयारी आणि गडबड चालू असताना घरातील स्त्रीला कामावर रुजू होण्यासाठी सांगतात. घरातील ही स्त्री डॉक्टर असते. तरीही घरातील प्रमुख स्त्री म्हणून ती घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी जाते. तिच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील तिला कशाप्रकारे पाठिंबा देतात, हे या गाण्यात दाखवले आहे.

अमृता फडणवीस यांनी या गाण्याची एक झलक ट्वीटमधून दाखवली आहे. नेटकऱ्यांनीही या गाण्यावल अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना त्यांचा आवाज आवडला आहे, तर अनेकजण या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले की, “खूप छान ताई.” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “अप्रतिम.” यासोबतच नेटकरी “गणपती बाप्पा मोरया,” म्हणत आहेत.

त्यांचा हा व्हिडिओ यूट्यूबवर देखील प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या गाण्याला यूट्यूबवर सहा लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला पोहचली संभावना, ‘या’ कारणामुळे पोलिसांनी लगावली तिच्या पतीच्या कानशिलात

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

हे देखील वाचा