‘आशिकी-2’ चित्रपटात आपल्या आवाजाची जादू पसरवून सगळ्यांना वेड लावणारा गायक अंकित तिवारी (Ankit Tiwari) रविवारी (6 मार्च) रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अंकितने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत, त्याचबरोबर अनेक गाणी संगीतबद्ध करून तो चर्चेत आला आहे . अंकित त्याच्या गाण्यांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही नेहमीच चर्चेत असतो.
अंकित तिवारीचा जन्म कानपूरमध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबाचा कानपूरमध्ये राजू सुमन अँड पार्टी नावाचा संगीत समूह आहे जो धार्मिक स्थळांवर कार्यक्रम करतो. अंकितची आई भजन गायिका आहे. अंकितचा जन्म 6 मार्च 1990 रोजी झाला. अंकितला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. संगीत क्षेत्रात आपलं नाव कमवायचं आणि मोठा गायक होण्याचं स्वप्न त्याने तेव्हापासुन पाहिले होते. त्याने पल्लवी शुक्लासोबत लग्न केले, त्याच्या आजीच्या पसंतीनुसार हा विवाह सोहळा पार पडला होता.
अंकित तिवारीने टीव्ही कार्यक्रमांसाठी संगीत बनवून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘दो दूनी चार’ या चित्रपटातून त्याला पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी संगीत दिल्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी ‘आशिकी 2’ , ‘तेरी गल्लियाँ’ , ‘सुन रहा है ना तू ‘ या चित्रपटांमध्ये मिळाली.
‘आशिकी 2’ मधील ‘सुन रहा है तू’ गाण्याने संगीतकार आणि गायक म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या अंकित तिवारीने संगीत जगतात स्वत:चे नाव कमावण्यासाठी संघर्ष केला आहे. ‘आशिकी 2’ नंतर अंकित ‘एक व्हिलन’ आणि ‘रॉय’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. त्याच्या रोमँटिक गाण्यांनी सगळ्यांनाच वेड लावले होते. अंकितने अनेक बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये रोमँटिक गाणी गायली आहेत आणि अनेकांना संगीतही दिले आहे. म्हणूनच लोक त्याला रोमँटिक गायक म्हणतात, आपल्याला मिळालेल्या या यशाबद्दल बोलताना तो म्हणतो की, “जर माझे नाव एखाद्या प्रेमगीताशी जोडले गेले असेल तर मला त्याचा अभिमान आहे, कारण एखाद्या शैलीशी जोडले जाणे ही भारतीय संगीत उद्योगातील सर्वात मोठे यश आहे.” दरम्यान अंकितच्या जादूई आवाजाने अनेक गाणी सुपरहीट ठरली आहेत. त्याचा सोशल मीडियावरही प्रचंंड मोठा चाहतावर्ग आहे.
- हेही वाचा-
- कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या सोनाक्षीने काही लाखांसाठी इव्हेंट मॅनेजरला घातला गंडा? कोर्टाकडून वॉरंट जारी
- युक्रेनहून परतलेल्या उर्वशी रौतेलाने सांगितला किस्सा; घाबरत म्हणाली, ‘परिस्थिती खूपच…’
- मनीष मल्होत्राच्या पार्टीत ६३ वर्षांच्या नीतू कपूर सर्वांवर पडल्या भारी; डान्स पाहून तुमचेही थिरकतील पाय