Friday, March 29, 2024

अंकित तिवारीने केले आजीच्या पसंतीच्या मुलीशी लग्न, जाणून घ्या कधी झाला कांदे पोह्यांचा कार्यक्रम

बॉलिवूडचा प्लेबॅक सिंगर अंकित तिवारी हा या दिवसात टेलिव्हिजनवरील शो ‘स्मार्ट जोडी’मुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये अंकित आणि पत्नी पल्लवी देखील आहे. या शोमध्ये त्या दोघांची जोडी सगळ्यांना आवडत आहे. बीटाऊमध्ये अंकित आणि पल्लवी मस्त लव्ह गोल देताना दिसत आहेत. पल्लवी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या पतीचे कौतुक करत असते. परंतु त्यांच्यातील प्रेम पाहून ही गोष्ट अनेकांना समजणार देखील नाही की, त्या दोघांचे अरेंज मॅरेज झाले आहे. अंकित हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. असे म्हटले जात आहे की, अंकितने त्याच्या आजीच्या आवडीच्या मुलीशी लग्न केले आहे. चला तर जाणून घेऊया नक्की कुठे आणि कसा झाला यांचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम?

अंकित तिवारीने (ankit tiwari) आदित्य रॉय कपूर (aditya roy kapoor) आणि श्रद्धा कपूर (shraddha kapoor) यांच्या ‘आशिकी २’ या चित्रपटात ‘सून रहा है ना तू’, ‘एक विलन’ मधील ‘तेरी गलिया’, ‘तू है की नहीं’ यांसारखी सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याची अनेक गाणी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म ६ मार्च १९९० मध्ये झाला. (Singer Ankit Tiwari met his wife pallavi Shukla in the train let’s know his love story)

अंकितने २३ फेब्रुवारी २०१८ साली पल्लवीसोबत लग्न करून चर्चेत आला होता. सोशल मीडियावर त्याची होणारी पत्नी कोण कशी याबद्दल अनेक खुलासे होत होते. अंकितने त्याच्या साखरपुड्याचे एक फोटो शेअर करून लिहिले होते की, “मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहील. तुझी काळजी घेईल आणि तुझा आदर करेल.”

पल्लवी शुक्लासोबत त्याची पहिली भेट आणि लग्नाबाबत त्याच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता. त्याने सांगितले की, तो कसा पल्लवीसोबत लग्न करण्यासाठी तयार झाला. अंकित तीवरीच्या आजीची पल्लवीसोबत पहिली भेट एका ट्रेनमध्ये झाली होती. त्यावेळी त्याच्या आजीला पल्लवी एवढी आवडली की, तिने तिला तिच्या नातवासाठी पसंत केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबाची बातचीत झाली आणि २१ फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुडा झाला. अशाप्रकारे त्याने त्याच्या आजीला आवडलेल्या मुलीशी लग्न केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा