आजकाल अनेक सेलिब्रिटी संत प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी वृंदावनला पोहोचतात. अलिकडेच गायक बादशाह (Badshah) देखील प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात दिसला. त्याने महाराजांना त्यांच्या जीवनाबद्दल अनेक प्रश्न विचारले.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गायक बादशाह आपल्या भावासोबत प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात पोहोचला आहे. त्याचा भाऊ बादशाहच्या वतीने एक प्रश्न विचारतो. तो विचारतो की पूर्वी आपण भाऊ लोकांना मदत करणे आणि सत्य बोलणे हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानायचो, पण जेव्हा आपण सत्य बोलतो तेव्हा नाती तुटतात. अशा परिस्थितीत काय करावे? यावर प्रेमानंद महाराज त्याला सत्याच्या मार्गावर राहण्याचा सल्ला देतात.
व्हिडिओमध्ये दिसतंय की बादशहाचा भाऊ प्रेमानंद महाराजांना जीवनाबद्दलचे सर्व प्रश्न विचारत आहे. तर बादशह शांत बसून संत प्रेमानंद महाराजांचे ऐकत आहे. सत्संगात असल्याने बादशहाच्या चेहऱ्यावर एक आध्यात्मिक शांती दिसते.
गायक बादशाह व्यतिरिक्त, शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनीही प्रेमानंद महाराजांच्या सत्संगाला हजेरी लावली. प्रेमानंद महाराजजींना भेटण्यासाठी अनेक प्रसिद्ध गायकांनी वृंदावनला भेट दिली आहे. त्यात मिका सिंग आणि गायक बी प्राक यांचाही समावेश होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
२४ वर्ष जुन्या गाण्यावर आमिरने केला डान्स, ‘सितारे जमीन पर’च्या सक्सेस पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
राजकुमार रावने निभावल्यात या आव्हानात्मक भूमिका, ‘शाहिद’ पासून ‘श्रीकांत’ पर्यंत भूमिका ठरल्या खास










