Tuesday, December 3, 2024
Home बॉलीवूड ‘काय चादर गुंडाळून येतेस’ म्हणत, ‘या’ गायकाने कपड्यांवरून केला होता लतादीदींचा अपमान

‘काय चादर गुंडाळून येतेस’ म्हणत, ‘या’ गायकाने कपड्यांवरून केला होता लतादीदींचा अपमान

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज देशभर शोककळा पसरली आहे. गेली महिनाभर त्यांच्या आजारपणाबद्दल बातम्या समोर येत होत्या. मात्र मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

आपल्या असामान्य आवाजाने भारतीय संगीतक्षेत्राला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या गाणकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांनी ३६ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आपल्या मधुर आवाजाने त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले त्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कित्येक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९४२ व्या वर्षीपासून म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीपासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. तब्बल सात दशके त्यांनी या क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांना सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यांपैकीच त्यांच्या आणि संगीतकार जीएम दुर्रानी यांच्यामधील वाद चांगलाच गाजला होता. ते त्या काळातील प्रख्यात गायक होते त्यांनी आपल्या चित्रपटात गायन करावे अशी त्या काळात प्रत्येकाची इच्छा असायची.

हा किस्सा आहे एका चित्रपटासाठी लता मंगेशकर, नौशादा साहेब,आणि दुर्रानी रेकॉर्डिंग करत होते. त्यावेळी घडलेला एक किस्सा नौशाद साहेबांनी सांगितला होता, ते म्हणाले की, “रेकॉर्डिंग रूममध्ये गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु होते. त्या काळात फक्त दोनच माइक होते एक संगीतकारासाठी आणि दुसरा गायकासाठी. त्यावेळी दुर्रानी आपली गाण्याची ओळ पूर्ण होताच जेव्हा लतादीदी गायला घ्यायच्या, तेव्हा ते माइकवर काहीतरी मस्ती करत असायचे त्यामुळे लता दीदीना गाताना अडथळा निर्माण होत होता. बराच वेळ असे झाल्यानंतर शेवटी मीच त्यांना खडसावत शांत राहण्यास सांगितले होते.”

मात्र या संपूर्ण प्रकारामुळे लता दीदी खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांनी गायला सुरुवात केल्यानंतर दुर्रानीने पून्हा तशाच प्रकारचा अडथळा आणण्यास सुरुवात केली .इतकेच नव्हेतर त्याने लता दीदींना चक्क त्यांच्या कपड्यावरुन बोलायला सुरुवात केली होती. “तु नेहमी पांढरे कपडे का घालतेस रंगीत कपडे का घालत नाहीस?, अशी कशी चादर गुंडाळून येतेस” असे अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांच्या या बोलण्यावर संतापलेल्या लता दीदींनी जो माणूस माझ्यातील कलेपेक्षा माझ्या कपड्यांवर जास्त लक्ष देतो, अशा माणसाबरोबर मी पुन्हा काम करणार नाही,” असे त्याचवेळी ठणकावून सांगितले होते. दरम्यान लता मंगेशकर यांच्या या गौरवशाली कारकिर्दिसाठी त्यांना अनेक पुरस्कार बहाल करण्यात आले होते.

हेही वाचा :

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा