बॉलिवूडमधील अतिशय उच्च आणि भारदस्त आवाज म्हणून गायक कैलास खेर ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या जादुई आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. कैलास खेर त्यांच्या गाण्यासोबतच विविध कॉन्सर्टसाठी देखील प्रसिद्ध आहे. ते अनेकदा कॉन्सर्टमधे गाताना दिसतात. सध्या कैलास खेर कर्नाटकमध्ये असून, ते हंपी महोत्सवात सामील होण्यासाठी गेले आहेत. हंपीमध्ये त्यांच्या एका कॉन्सर्टचे देखील आयोजन केले गेले होते. या कॉन्सर्टमधे सहभागी होण्यासाठी हजारो लोकं उपस्थित होते. त्यांच्या आवाजावर अनेक लोकं डान्स करत होते. कैलास खेर यांच्या गाण्यामध्ये सर्व हरवून गेले होते, कैलाश स्वतः देखील गाणी गाण्यात तल्लीन झाले होते, अशातच एक घटना घडली आणि एकच गोंधळ झाला.
कैलाश खेर स्टेजवर गाणी गात असताना अचानक त्यांच्यावर काचेच्या बाटल्या फेकल्या गेल्या. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सर्वच भंडावून गेले, मात्र कैलाश यांच्यासोबत स्टेजवर असणाऱ्या सहगायिकेने त्यांना या हल्ल्यापासून कसेबसे वाचवले आणि दूर घेऊन गेल्या. या घटनेनंतर पोलीस देखील लगेच कामाला लागले आणि त्याने काही मिनिटातच हल्लेखोराला पकडले.
भारत का पुरातन नगर,काल खंड को मन्दिरों और अटारियों के स्वरूप में समाहित किये,जिसका इतिहास विश्व के कौतुक को गतिमान करता आज भी #HampiMahotsav में आज @bandkailasa #KailasaLiveInConcert का शिवनाद गूँजेगा.आज भी सब राजसी शिल्प,इतिहास,कला,संगीत का मेला, @KarnatakaWorld @kkaladham pic.twitter.com/EuCkvhP17P
— Kailash Kher (@Kailashkher) January 29, 2023
हंपीमध्ये चालू असणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर कैलास खेर यांच्या तब्येतीशी संबंधित असलेली कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. कैलाश खेर आणि त्यांचा बँड या कॉन्सर्टमधे सामील झाले होते. हा हल्ला का झाला यामागे सांगितले जात आहे की, कॉन्सर्टमधे सहभागी झालेला एक व्यक्ती सारखा कन्नड गाणे गाण्यासाठी सांगत होता. मात्र कैलास यांच्यापर्यंत त्याची ही मागणी पोहचते तोपर्यंत त्याने त्यांच्यावर काचेची बाटली फेकून मारत त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी त्याच्या नोंदवलेल्या जबाबात त्याने हीच माहिती दिली आहे.
तत्पूर्वी कैलाश खेर यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून ते स्वतः हंपी महोत्सवात सामील होण्यासाठी जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, “भारताचे प्राचीन शहर, ज्यात काळ खंड मंदिरे आणि पोटमाळ्याच्या रूपात समाविष्ट केले गेले आहे. ज्याचा इतिहास जगाची स्तुती करतो. आज हंपी महोत्सवात बँड कैलाशा. कैलास लाईव्ह इन कॉन्सर्टचा शिवनाद गुंजणार आहे. आजही सगळी राजेशाही कलाकुसर, इतिहास, कला, संगीत जत्रा.”
तत्पूर्वी कैलाश खेर यांनी अनेक चित्रपट, अल्बम, मालिकांमध्ये गाण्यांना आवाज दिला असून, त्यानी भारतातील विविध भाषांमध्ये अनेक गाणी गेली आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कधीकाळी नाना पाटेकरांसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा जुल्का, सध्या करते ‘हे’ काम
मधुबाला आधी ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला ‘अनारकली’ची मिळाली होती ऑफर, जाणून घ्या कोण आहे ‘ती’ अभिनेत्री