हॉलिवूड गायिका कॅटी पेरी (Katy Perry) नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेते. तिचा प्रत्येक लूक चर्चेचा विषय ठरतो. मेट गालामध्येही ती तिच्या वेगवेगळ्या पोशाखांमुळे खूप चर्चेत असते. यामुळे ती अनेकदा ऊप्स मूमेंटची शिकारही बनली असली आहे. मात्र यावेळी ती ड्रेसमुळे ऊप्स मूमेंटची बळी ठरली नाही, तर भर इव्हेंटमध्ये खुर्चीवरून पडली. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ तिने स्वतः शेअर केला आहे.
खरं तर, कॅटी पेरी सध्या अमेरिकन आयडॉलला जज करत आहे आणि याचदरम्यान ती जलपरीच्या लूकमध्ये शोमध्ये पोहोचली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शोचा होस्ट स्पर्धकांबद्दल बोलत आहे आणि जजिंग पॅनेलमध्ये बसलेली कॅटी पेरी तिच्या खुर्चीवरून खाली पडते. हा ड्रेस घालणे तिला चांगलेच महागात पडले, कारण फिश कट आउटफिट असल्यामुळे तिला स्वतःहून उठताही येत नव्हते. त्यामुळे होस्ट आणि पॅनेलच्या को-जजेसने खूप प्रयत्न करून तिला उचलले. (singer katy perry falls from chair while dressed as mermaid on american idol show)
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कॅटी पेरी खाली पडताच बाकीचे जज लोटपोट होऊन हसू लागतात. परंतु कॅटीनेही हा विचित्र क्षण अतिशय हुशारीने हाताळला आणि स्वतःही हसली. यावेळी जजेससह प्रेक्षकांनाही हसू आवरता आले नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शोमध्ये कॅटी पेरीला खुर्चीपर्यंत आणण्यासाठी ट्रॉलीचा वापर करण्यात आला होता, कारण तिला तिच्या आउटफिटमुळे चालताही येत नव्हते.
कॅटीने तिच्या बॉर्डरोबसाठी विचित्र लुक निवडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मेट गालामध्येही तिचा प्रत्येक आऊटफिट अतरंगी आणि लक्ष वेधी असतो. २०१९ च्या मेट गाला इव्हेंटमध्ये, कॅटी पेरी झुंबरच्या पोशाखात आली होती, ज्याचे बल्ब प्रत्यक्षात जळत होते. त्याचप्रमाणे, एकदा ती बर्गर आउटफिट घालून मेट गालामध्ये पोहोचली होती, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा