Tuesday, July 1, 2025
Home हॉलीवूड अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका कॅटी पेरीच्या हातावर आहे संस्कृत भाषेतील ‘हा’ टॅटू; तुम्हाला माहितीये का अर्थ?

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका कॅटी पेरीच्या हातावर आहे संस्कृत भाषेतील ‘हा’ टॅटू; तुम्हाला माहितीये का अर्थ?

आपण अनेक वेळा असे काही फोटो आणि व्हिडिओ पाहतो, ज्यातून आपल्याला हे समजते की, इतर देशांमध्ये हिंदी आणि संस्कृत भाषांची क्रेझ वाढत आहे. अनेक परदेशी केवळ भारतीय वेशभूषा परिधान करत नाहीत, तर भारतीय संस्कृती देखील शिकण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यांमध्ये कॉमन आहे तो म्हणजे टॅटू. अशा कलाकारांची खूप मोठी लिस्ट आहे, ज्यांनी हिंदी आणि संस्कृतमध्ये टॅटू बनवला आहे. परदेशात असे अनेक लोक आहेत ज्यांनी देवनागरी भाषेत टॅटू बनवला आहे. यामध्ये अनेक नामांकित व्यक्तींचा देखील समावेश आहे.

असाच एक टॅटू आहे, जो नेहमीच ट्रेंडमध्ये आहे. तो म्हणजे ‘अनुगच्छतु प्रवाहं’. भारतातील अनेकांनी ‘अनुगच्छतु प्रवाहं’ हा टॅटू केला आहे. तर या टॅटूची ट्रेंड आता परदेशात जाऊन पोहचली आहे. अमेरिकेमधील प्रसिद्ध गायक आणि लेखक कॅटी पेरीने देखील हा टॅटू केला आहे. तिच्या या टॅटूचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. चला तर जाणून घेऊया या वाक्याचा नक्की अर्थ काय आहे, ज्याचा टॅटू सर्वजण काढत आहेत.

‘अनुगच्छतु प्रवाहं’ या वाक्याचा अर्थ आहे, प्रवाहासोबत पुढे जाणे. म्हणजेच आपल्या आयुष्यात जे काही होत आहे ते सगळ स्वीकारून त्याच्या सोबत पुढचा मार्ग निवडणे. त्यामुळे सगळ्यांना हा टॅटू खूपच आवडत आहे. भारतात तर या टॅटूची ट्रेंड आहे. पण परदेशात देखील हा टॅटू चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. या टॅटूचे टी शर्ट देखील बाजारात उपलब्ध आहे. परदेशातील एका ई कॉमर्स वेबसाईटवर देखील हा टॅटू लिहिलेला टी- शर्ट आहे. जो खूप महाग किमतीत विकला जातो.

परदेशातील अनेक नामांकित व्यक्तींनी हा टॅटू केला आहे. त्यामध्ये रिहाना, डॅविड बेखम, एडम लेविन यांसारख्या अनेक व्यक्तींचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा