Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड गायक केकेचा वाचला असता जीव, जर त्याला वेळेवर…, पोस्टमोर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा खुलासा

गायक केकेचा वाचला असता जीव, जर त्याला वेळेवर…, पोस्टमोर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा खुलासा

बॉलिवूडमधील किंबहुना मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ याचे ३१ मे रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले. त्याच्या अशा या अचानक जाण्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये कॉन्सर्टसाठी गेलेल्या केकेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. केकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केकेच्या मृत्यनंतर त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले, जेणेकरून त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. या पोस्टमार्टमनंतर जो अहवाल समोर आला आहे, तो खूपच धक्कादायक आहे. डॉक्टरनी सांगितले की, जर केकेला वेळेवर सीपीआर मिळाला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

कार्डियो पल्मोनरी रिससिटैशन (CPR) मध्ये बेशुद्ध व्यक्तीच्या छातीवर दबाब टाकला जातो आणि त्याला कृत्रिम श्वास दिला जातो, जेणेकरून त्याच्या फुप्फुसांना ऑक्सिजन मिळत राहावा. यामध्ये हृदयविकाराचा झटका आणि श्वास न घेता येणाऱ्या परिस्थिती व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, केकेच्या हृदयाच्या एका बाजूच्या मुख्य कोरोनरी धमनीमध्ये मोठा ब्लॉक होता आणि इतरही काही धमन्यांमध्ये लहान लहान ब्लॉक होते. केकेने त्याच्या कॉन्सर्ट दरम्यान अतिशय जोशात आणि उत्साहात परफॉर्मन्स दिल्याने त्याचा रक्तप्रवाह थांबला ज्यामुळे त्याचे ठोके वाढले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. जर केकेला बेशुद्ध झाल्यानंतर लगेचच त्याला सिपीआर दिले गेले असते तर त्याचा जीव वाचला असता. केके बऱ्याच काळापासून हृदयाच्या संबंधित तक्रारीने ग्रस्त होता. या तक्रारींवर त्याने उपचार घेतलाच नाही.”

कॉन्सर्टमधे परफॉर्मन्स दरम्यान केके स्टेजवर फिरत होता आणि अनेकदा त्याने गर्दीसोबत डान्स देखील केला. ज्यामुळे अधिक ऊर्जा निर्माण झाली आणि रक्तप्रवाह थांबला. यामुळे त्याचे ठोके मधेच थांबले आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याच्या हृदयाची गती देखील मंद झाली. केके काही अँटासिड घेत होता. कदाचित त्याला त्रास होत होता आणि तो ते समजू शकत नव्हता. त्याला ऍसिडिटी सारखे वाटत असेल आणि तो अँटासिड घेत होता. पोलिसांना त्याच्या हॉटेल रूममध्ये देखील अँटासिडच्या गोळ्या मिळाल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा