‘या’मुळे कुमार सानू यांनी घेतला अनु मलिकचा बदला, ‘सा रे गा मा पा’मध्ये सांगितले कारण


आजपर्यंत आपल्या चित्रपटसृष्टीला अनेक दिग्गज गायक लाभले आहेत. त्यात किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, सोनू निगम, उदित नारायण, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल यांसारख्या अनेक गायकांचा समावेश आहे. या गायकांनी आपल्या सुरेल गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यातील एक गायक म्हणजे, कुमार सानू होय. कुमार यांनी नुकताच आपल्या अपूर्ण स्वप्नाबाबतचा खुलासा केला आहे.

कुमार सानू यांनी सांगितले की, ‘बाजीगर’ या चित्रपटातील गाण्यात रॅपवाला भाग त्यांना गायचा होता. ‘तुझे देखा तो’ आणि ‘चुरा के दिल मेरा’ यांसारखे सुपरहिट गाणे गाणाऱ्या कुमार सानू यांनी ‘सा रे गा मा पा’ या टीव्ही शोवर आपल्या अपूर्ण स्वप्नाबाबत सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी शोदरम्यान अनु मलिक यांचे ‘ये काली काली आंखे’ हे गाणे रिक्रिएट केले आणि याचा रॅपवाला भाग सर्वांना ऐकवला. या शोमध्ये ते पाहुणे म्हणून सामील झाले होते. (Singer Kumar Sanu Took Revenge From Anu Malik On Singing Reality Show Sa Re Ga Ma Pa)

कुमार सानू यांनी घेतला अनु मलिकचा बदला
शोमधील संवादादरम्यान कुमार सानू म्हणाले की, “मला खरोखरच अनु मलिकचा बदला घ्यायचा होता. कारण त्याने मला ‘ये काली कली आंखे’चा रॅप भाग गायला दिला नाही.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी हे सहज करू शकलो असतो, पण त्याने मला ते करू दिले नाही. तेव्हापासून मला मनापासून इच्छा होती की, एक दिवस मी गाण्याचा हा भाग गाऊन त्याचा बदला घेईन.”

जुना किस्सा रियॅलिटी शोमध्ये केला शेअर
“आज मी ‘सा रे गा मा पा’च्या सेटवर अनु मलिकसोबत माझे खाते सेटल केले आहे,” असेही कुमार सानू पुढे बोलताना म्हणाले. या रियॅलिटी शोच्या ताज्या एपिसोडमध्ये विशाल दादलानी (Vishal Dadlani), शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) जज बनले होते.

‘सा रे गा मा पा’ शो कोण करतो होस्ट?
अभिनेता आणि गायक आदित्य नारायण हा शो होस्ट करत असून हा शो दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता झी टीव्हीवर प्रसारित केला जातो. विशेष म्हणजे, ‘सा रे गा मा पा’ हा झी टीव्हीच्या सर्वात जुन्या आणि यशस्वी शोपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Latest Post

error: Content is protected !!