Thursday, February 6, 2025
Home बॉलीवूड कॉलेजमध्ये सिनियर्सने रॅगिंग केले आणि कुणाल गांजावालाला सूर गवसला, वाचा त्याचा गायक होण्याचा प्रवास

कॉलेजमध्ये सिनियर्सने रॅगिंग केले आणि कुणाल गांजावालाला सूर गवसला, वाचा त्याचा गायक होण्याचा प्रवास

‘सावरखेड एक गावं’ हा चित्रपट आठवला की पहिल्यांदा ‘वाऱ्यावरती गंध पसरला’ हे गाणे डोळ्यासमोर येते. या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच भूरळ घातली होती. आजही हे गाणे अनेकांच्या ओठांवर असते. या प्रसिद्ध गाण्याचा गायक कुणाल गांजावाला (Kunal Ganjawala) १४ एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या बहारदार आवाजाने प्रत्येकाच्या मनात घर केलेला गायक म्हणून कुणाल गांजावालाची खास ओळख आहे. मात्र कॉलेजमधल्या रॅगिंगने कसा त्याच्या गायनाला सुर गवसला याची खास स्टोरी त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ.

कुणाल गांजावाला हा बॉलिवूडमधील अशा गायकांपैकी एक आहे ज्याच्या आवाजाने अनेकांना वेड लावले होते. आपल्या दमदार आवाजाने कुणालने अनेक गाणी सुपरहीट केली. इम्रान हाश्मीच्या मर्डर चित्रपटातील ‘भिगे होठ तेरे’ या गाण्याने कुणालला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ज्यानंतर त्याला कधीही मागे वळून पहावे लागले नाही. आपल्या संगीत क्षेत्रातील वाटचालीबद्दल बोलताना त्याने सांगितले होते की, चित्रपटात गाण्याआधी तो जिंगल्स गाायचा. सुरुवातीला त्यांना जिंगल्स गाण्यासाठी 1500 रुपये मिळायचे. ही त्याची कमाई देखील होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ‘मर्डर’ चित्रपटात त्याला गाण्याची संधी मिळाली आणि तो रातोरात स्टार गायक बनला. कुणाल गांजावालाने ‘साथिया’मधील ‘हमदम सुनियो रे’, ‘कुछ कुछ होता है’मधील ‘कोई मिल गया’ यांसारखी लोकप्रिय गाणीही गायली. ज्यामुळे त्याला रातोरात स्टार केले.

मात्र कुणालची प्रसिद्ध गायक बनण्याची कथा मात्र फारच रंजक आहे. आपण गायक होऊ असे त्याला कधीच वाटले नव्हते. त्याने ना संगीताचे धडे घेतले आहेत ना कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला आहे. मुंबईच्या एलिफंटाईन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात असताना रॅगिंगच्या नावावर सीनियर्सनी गाणे गाण्यास सांगितले तेव्हा त्याने ‘एक दिन बिक जायेगा’ आणि ‘नजर के सामने’ सारखी गाणी गायली. कॉलेजचे सीनियर्स त्याच्या गाण्याने इतके प्रभावित झाले की त्यांना कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये गाण्यास सांगितले. इथूनच त्याची गाण्याची आवड वाढली.

आपल्या या यशाबद्दल बोलताना कुणाल म्हणाला की ,”मी हजारो गाणी गायली आणि अनेक कार्यक्रम, कॉन्सर्ट केले, पण हळूहळू प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. किशोर कुमार आल्यावर रफी साहेबांना कमी गाणी मिळू लागली, पण तरीही त्यांचा आवाज लोकांना आवडतो. तसाच माझा काळ आता निघून गेला आहे.” दरम्यान २०२० मध्ये, कुणाल गांजावालाने रेकॉर्ड लेबलवर मनमानी करत गायकांची कारकीर्द नष्ट केल्याचा आरोप केला. रेकॉर्ड लेबलमुळे गायकांना महिनोमहिने पैसे मिळत नाहीत, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. सध्या आता कुणाल गांजावाला यांनी स्वत:चे यूट्यूब चॅनल उघडले असून स्वत:चा व्यवसायही सुरू केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा