कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री


बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक दिवसानंतर त्याचे एक मराठी गाणे समोर आले आहे. त्याच्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर या गाण्याने अवघ्या तरुण वर्गाचे लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निक शिंदे आणि सानिका भोईते यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

त्याचे ‘भन्नाट पोरगी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. कुणाल आणि करण यांनी या गाण्याला गीत आणि संगीत दिले आहे. हे गाणे कुणाल गांजावाला आणि सोनाली सोनवणे यांनी गायले आहे. मराठी, कोकणी, कन्नड अशा तीन भाषांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतोय. याविषयी एस प्रॉडक्शनचे निर्माते अजय अंकुश पाटील म्हणाले, ”इसक झालं रं या रोमँटिक गाण्याला १० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे दुसरं गाणंही धमाकेदार आणण्याचा विचार चालू असतानाच कुणाल-करणने मला ‘भन्नाट पोरगी’ गाणं ऐकवलं आणि ऐकताक्षणीच ठेका धरायला पटकन भाग पाडणा-या या गाण्याची निर्मिती करायचा मी विचार केला.” (Bollywood singer Kunal ganjawala bhannat porgi song viral on social media)

‘भन्नाट पोरगी’ गाण्याचे दिग्दर्शन अनेक सुपरहिट म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक सचिन कांबळे यांनी केले आहे. ते म्हणतात की, ”दाक्षिणात्य ठेक्यावरचे मराठी गाणे असल्याने साउथ इंडियन मुलगी आणि मराठी मुलाची एक रोमँटिक लव्हस्टोरी यात आम्ही चित्रित केली. गाण्यात डान्स करताना खूप एनर्जीची आवश्यकता होती. त्यामुळे निक-सानिकाची निवड करण्यात आली.” निक शिंदे गाण्याविषयी सांगतो, “ हा माझा सहावा म्युझिक अल्बम आहे. मी पहिल्यांदाच एवढा भन्नाट डान्स केलाय. गाण्यातल्या एका सिक्वेन्समध्ये मला लुंगी घालून डान्स करायचा होता. खरं तर, साउथ सिनेमांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांना लुंगी घालून नाचताना पाहताना मलाही तसं नाचावसं वाटायचं. पण जेव्हा मला लुंगी घालून नाचायचं होतं. तेव्हा मात्र मी खूप अवघडल्यासारखा झालो होतो. पण हे एवढं एनर्जेटिक गाणं करून खूप मजा आली.”

त्यांच्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकजण या गाण्यावर रिल्स देखील तयार करत आहेत. निक आणि सानिका हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या गाण्याला सगळेजण खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. निक आणि सानिकाचा हा पहिलाच एकत्र केलेला म्युझिक अल्बम आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा

‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच

-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता


Latest Post

error: Content is protected !!