Friday, July 5, 2024

कोरोना युद्धात भारताच्या ‘गानकोकिळे’चा सहभाग; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केली मोठ्ठी मदत!

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढताना दिसत आहे. दररोज मृत्यूचा नवीन आकडा समोर येत आहे. यामुळे सर्वांनाच चिंता लागली आहे. अशामध्ये अनेक दिग्गज मंडळी मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. अशातच बातमी आली आहे की, ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लाखो रुपयांची मदत केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल ७ लाख रुपयांची मदत केली आहेे. त्यांच्या या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

विशेष म्हणजे, कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाने आर्थिक मदत देण्यासाठी इच्छूक असलेल्यांसाठी कोव्हिड- १९ मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्थापन केला आहे. शासनाकडूनही यामध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यानिमित्ताने, जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

अशी करा मदत

कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने होईल तेवढी मदत करू शकतात. यासाठी बँक खात्याची माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोव्हिड १९
बँकेचे बचत खाते क्रमांक- ३९२३९५९१७२०
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई- ४०००२३
शाखा कोड- ००३००
आयएफएससी कोड- SBIN००००३००
निधीसाठी आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

Chief Minister’s Relief Fund- COVID 19
Savings Bank Account Number- 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai- 400023
Branch Code- 00300
IFSC CODE- SBIN0000300

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

हे देखील वाचा