Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड वाढदिवस खास! गायक मोहित चौहान यांना मिळाला आहे ‘या’ देशाच्या सांस्कृतिक दूत असल्याचा मान

वाढदिवस खास! गायक मोहित चौहान यांना मिळाला आहे ‘या’ देशाच्या सांस्कृतिक दूत असल्याचा मान

आह बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मोहित चौहान यांचा वाढदिवस आहे. त्यानी बॉलिवूडमध्ये आणि इतर प्रादेशिक चित्रपटांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. यासोबतच ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असून, भटक्या कुत्र्यांसाठी ते अनेकदा विविध कार्य करताना दिसतात. त्यांना आजवर अनेक लहान मोठ्या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. यात त्यांना एक असा बहुमान मिळाला आहे, जो खूप कमी गायकांना मिळत असतो. एखाद्या परकीय देशाचा सांस्कृतिक दूत होण्याचा. मोहित चौहान यांना मंगोलिया या देशाने त्यांच्या सांस्कृतिक दूत होण्याचा मान दिला आहे.

सध्याच्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख आवाजांपैकी एक असलेले गायक मोहित चौहान (Mohit Chauhan) यांची भारतातील मंगोलियाचे सांस्कृतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगोलियाचे दंबजाव गंडबोल्ड यांनी या संदर्भात नवी दिल्लीत मोहित चौहान यांचा गौरव केला आणि प्रमाणपत्र देऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.  

भारतीय चित्रपट, कला आणि संगीताची संस्कृती जगभरातील अनेकांचे मनोरंजन करत त्यांना प्रेरणा देते. असा सन्मान मिळणे म्हणजे कलेसाठी केलेले प्रयत्न आणि प्रामाणिक वचनबद्धता दर्शवते. याचे मोहित चौहान यांच्यापेक्षा चांगले उदाहरण कोणतेच असू शकत नाही. मोहित म्हणतात की, “हा सन्मान मिळणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. ही माझ्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे. मी माझ्या कला आणि संगीताला जितक्या उत्कटतेने जगले आहे. तितक्याच उत्कटतेने ते पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे. मला जगभरातून आणि विशेषत: मंगोलियाकडून खूप प्रेम मिळाले आहे, त्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Chauhan (@mohitchauhanofficial)

फार कमी लोकांना माहिती असेल की, हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असण्यासोबतच मोहित सामाजिक कार्यातही सतत सक्रिय असतात. ते आपला बराच वेळ समाजसेवेसाठी घालवतात. आजकाल ते त्वरित वैद्यकीय मदत देऊन जीव वाचवण्याच्या मिशनमध्ये व्यस्त आहेत. इतकेच नाही, तर त्यांना प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि ते ‘एनिमल्स आर पीपल टू’ हा उपक्रम चालवतात.

गायक मोहित चौहान यांचा जन्म ११ मार्च १९६६ रोजी हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत झाले परंतु नंतर त्यांनी हिमाचल प्रदेशमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी धर्मशाला कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. २९ जून २०१२ रोजी मोहित यांनी दिल्लीस्थित पत्रकार प्रार्थना गेहलोतशी लग्न केले.

मोहित चौहान यांनी गायक म्हणून कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. पण गाण्याव्यतिरिक्त ते गिटार आणि बासरीही उत्तम वाजवतात. नव्वदच्या दशकात त्यांनी इतर दोन मित्रांसोबत सिल्क रूट नावाचा बँड तयार केला, ज्याचे ‘डुबा डूबा’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले, जे आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हे देखील वाचा