गायक मोहित चौहानने ‘सडा हक’, ‘तुझे भुला दिया’, ‘खून चला’, यांसारखी गाणी गाऊन संगीत विश्वात त्याचे एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले. बॉलिवूडमधील नावाजलेला प्लेबॅक सिंगर मोहित शुक्रवारी (११ मार्च) त्याचा वाढदिवस साजरा कत आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास माहिती.
मोहित चौहानचा (mohit chuhan) जन्म ११ मार्च १९६६ मध्ये झाला. अनेकांना ही गोष्ट माहीत देखील नसेल की, मोहितला गाण्यात नाहीतर अभिनयात त्याचे करीअर करायचे होते. त्याला थिएटर करायचे होते. त्याने काही नाटकात देखील काम केले आहे. परंतु त्याच्या नशिबात गायन लिहिले होते. ए.आर. रहेमानने ‘रंग दे बसंती’ मध्ये मोहितला संधी देऊन त्याच्या करिअरला वाट दाखवली. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी थिएटर केले आहे. एनसीडीच्या देखील राहिलो आहे. मी स्टेजवर अनेक मोठे नाटक देखील केले आहे. परंतु मी अभिनयाचा कोर्स केला नव्हता त्यामुळे मला जास्त संधी मिळाली नाही. जर तेव्हा मला सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या असत्या तर मी कदाचित अभिनय शिकलो असतो.” (Singer Mohit Chauhan celebrate his birthday let’s know about his life)
View this post on Instagram
‘डुबा डुबा’ या गाण्यातून ओळख मिळालेल्या बॅंड सिल्क रुटमध्ये भाग घेतला. या बॅंडमधील ‘डुबा डुबा’ या गाण्याने त्याला ओळख मिळाली. यानंतर २००५ मध्ये चंदन अरोरा यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘मै, मेरी पत्नी और वो’ या चित्रपटात त्याला गाण्याची संधी मिळाली. परंतु त्याला खरी ओळख ही ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून मिळाली.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिले होते. या चित्रपटातील ‘खून चला’ या गाण्याने मोहित चौहानला ब्रेक दिला. या चित्रपटात त्याने एवढे एकच गाणे गायले. परंतु या एकाच गाण्याने त्याचे आयुष्य बदलले. या गाण्याच्या वेळी तो खूप नर्व्हस होता. त्याला ही भीती होती की, तो हे गाणे नीट गाऊ शकेल की नाही. परंतु गाणे जेव्हा रिलीज झाले तेव्हा या गाण्याने धमाल केली. या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
मोहित चौहानला दोनवेळा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर हा अवॉर्ड मिळाला आहे. गाण्यासोबतच त्याला जंगल, जनावरे खास करून कुत्र्यांवर खूप प्रेम आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकवेळा डॉगचे फोटो पाहायला मिळतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या










