अभिमानास्पद! गायक मोहित चौहान बनले मंगोलियाचे सांस्कृतिक दूत, दिल्लीत राजदूताने दिले नियुक्तीचे पत्र

सध्याच्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख आवाजांपैकी एक असलेले गायक मोहित चौहान (Mohit Chauhan) यांची भारतातील मंगोलियाचे सांस्कृतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगोलियाचे दंबजाव गंडबोल्ड यांनी या संदर्भात नवी दिल्लीत मोहित चौहान यांचा गौरव केला आणि प्रमाणपत्र देऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

भारतीय चित्रपट, कला आणि संगीताची संस्कृती जगभरातील अनेकांचे मनोरंजन करत त्यांना प्रेरणा देते. असा सन्मान मिळणे म्हणजे कलेसाठी केलेले प्रयत्न आणि प्रामाणिक वचनबद्धता दर्शवते. याचे मोहित चौहान यांच्यापेक्षा चांगले उदाहरण कोणतेच असू शकत नाही. मोहित म्हणतात की, “हा सन्मान मिळणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. ही माझ्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे. मी माझ्या कला आणि संगीताला जितक्या उत्कटतेने जगले आहे. तितक्याच उत्कटतेने ते पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे. मला जगभरातून आणि विशेषत: मंगोलियाकडून खूप प्रेम मिळाले आहे, त्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे.”

View this post on Instagram

A post shared by Mohit Chauhan (@mohitchauhanofficial)

फार कमी लोकांना माहिती असेल की, हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असण्यासोबतच मोहित सामाजिक कार्यातही सतत सक्रिय असतात. ते आपला बराच वेळ समाजसेवेसाठी घालवतात. आजकाल ते त्वरित वैद्यकीय मदत देऊन जीव वाचवण्याच्या मिशनमध्ये व्यस्त आहेत. इतकेच नाही, तर त्यांना प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि ते ‘एनिमल्स आर पीपल टू’ हा उपक्रम चालवतात.

गायक मोहित चौहान यांचा जन्म ११ मार्च १९६६ रोजी हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत झाले परंतु नंतर त्यांनी हिमाचल प्रदेशमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी धर्मशाला कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. २९ जून २०१२ रोजी मोहित यांनी दिल्लीस्थित पत्रकार प्रार्थना गेहलोतशी लग्न केले.

View this post on Instagram

A post shared by Mohit Chauhan (@mohitchauhanofficial)

मोहित चौहान यांनी गायक म्हणून कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. पण गाण्याव्यतिरिक्त ते गिटार आणि बासरीही उत्तम वाजवतात. नव्वदच्या दशकात त्यांनी इतर दोन मित्रांसोबत सिल्क रूट नावाचा बँड तयार केला, ज्याचे ‘डुबा डूबा’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले, जे आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे.

हेही वाचा :

‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

Latest Post