Wednesday, June 26, 2024

आहा कडकच ना! आयफेल टॉवरसमोर नेहा कक्करने रोहनप्रीतला केले लिप-लॉक किस, युजर म्हणाला, ‘सावधान…’

प्रसिद्ध गायक नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. दोघांच्या चाहत्यांना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. त्यामुळे दोघीही सतत त्यांचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यामुळेच नेहा आणि रोहनप्रीतने त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे तुफान व्हायरल होत आहेत.

नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सध्या पॅरिसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत, ज्याची झलक त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना दाखवली आहे. रोहनप्रीत आणि नेहा या दोघांनीही आपापल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लिप लॉक किसचे फोटो शेअर केले आहेत. जे पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या खूप मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.

नेहाने लिहिले सुंदर कॅप्शन
नेहाने रोहनप्रीत सिंगसोबत लिप-किस करताना शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रेमाने भरलेले शहर, पॅरिस, जे खूप सुंदर दिसते. मात्र, जेव्हा तू माझ्या आजूबाजूला असतोस. रोहनप्रीत सिंग तुझ्याशिवाय काहीच नाही.” नेहाने शेअर केलेल्या फोटोंच्या बॅकग्राऊंडला आयफेल टॉवर दिसत आहे.

नेहाच्या या पोस्टवर कमेंट करताना रोहनप्रीत सिंगने लिहिले की, “माझं तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे, माय लव्ह.” नेहा आणि रोहनप्रीतचे हे फोटो पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली आहे की, “सावधान! नाहीतर बजरंग दल वाले पकडतील.” अशा अनेक मजेशीर कमेंट युजर्सनी केल्या आहेत. या फोटोंमध्ये नेहाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर रोहनप्रीत क्रीम रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री उर्वशीनेही या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, “आयुष्यात एकच आनंद आहे, तो म्हणजे प्रेम.” उर्वशीने फ्रेंच भाषेत ही प्रतिक्रिया लिहिली आहे. नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्करनेही या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. नेहा कक्करच्या या फोटोंवर इतर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या फोटोंना २२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नुकतेच नेहानेही तिच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तावर मौन सोडले. एक व्हिडिओ शेअर करताना नेहाने सांगितले होते की, ती प्रेग्नंट नाही, तीची थोडी तब्येत वाढली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या लग्नातील खास व्हिडिओ व्हायरल, केमिस्ट्री पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

-‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स

-सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार

हे देखील वाचा