Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

कलाकार आणि त्यांचे आलिशान जीवन कोणापासूनच लपून राहिलेले नाही. कलाकार आणि त्यांचे लक्झरी जीवन पाहून सामान्य लोकांना नेहमीच त्यांचे अप्रूप वाटत असते. त्यांच्या जीवनशैलीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. कलाकार आणि त्यांच्या घराबद्दल चाहत्यांच्या मनात असलेली उत्सुकता तर सर्वच जाणतात. कलाकार देखील फॅन्सची इच्छा ओळखून अनेकदा त्यांच्या घराचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रादेखील याला अपवाद नाही. प्रियांका तर लग्न करून अमेरिकेत सेटल झाली आहे. त्यामुळे तिच्या लाईफस्टाईलबद्दल आणि घराबद्दल चाहत्यांच्या मनात अधिकच उत्सुकता आहे. प्रियांका नेहमी तिच्या रोमॅंटिक डिनरचे, वेगवेगळ्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करतच असते. यातून चाहते तिच्या आलिशान जीवनाचा एक अंदाज घेतच असतील.

नुकताच निक जोनासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फॅन्ससाठी एक कमर्शियल व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांना माहित नव्हते की, व्हिडिओ जिथे शूट केला आहे, ते निक जॉनसचे लॉस एंजेलिसमधील आलिशान घर आहे. या व्हिडिओमध्ये निकच्या घरातील प्रत्येक कानाकोपरा दाखवला गेला असून किचन, जिम, स्विमिंग पूल, रेकॉर्डिंग स्टुडिओ आदी अनेक गोष्टींची झलक दिसली होती.

प्रियांका देखील अनेकदा तिचे तिच्या घरात काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे हे घर अतिशय भव्य असून त्याची किंमत जवळपास १४५ कोटी रुपये इतकी आहे. प्रियांकाच्या घराच्या छतावर स्विमिंग पूल असून तिथून हॉलिवूड हिल्सचा नजारा दिसतो. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिचा तिच्या घरातील एक फोटो पोस्ट केला होता ज्यात ती तिच्या मेन्शनच्या बाहेर उन्हात बसली होती. या फोटोत ती पांढऱ्या रंगाच्या टी- शर्टमध्ये आणि मल्टिकलकरच्या शॉर्ट्समध्ये पोझ देताना दिसत आहे. तिने हा फोटो पोस्ट करत लिहिले, “Sun, Sangria and Sass. Mood.”

प्रियांकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘मेट्रिक्स ४’ सिनेमात दिसणार आहे. शिवाय ती ‘सिटाडेल’ नावाच्या सीरिजमध्ये देखील दिसणार आहे. .

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समर सिंगच्या नवीन गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ; पाहायला मिळाला नीलम गिरीचा हॉट अंदाज

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

हे देखील वाचा