Saturday, June 29, 2024

ब्रेकिंग| पद्मश्री पुरस्कार विजेत्या गायकाचे दुखःद निधन, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

बॉलिवूड जगतातून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली असून प्रसिद्ध गीतकार, गायक आणि संगीत निर्देशक प्रफुल्ल कर(Prafulla Kar) यांचे दुखःद निधन झाले आहे. रविवार १७ एप्रिलच्या रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कालव क्षेत्रात त्यांचे अनमोल योगदान राहिले. या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबद्दल ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

प्रफुल्ल कर हे संगीत क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या जादुई आवाजाने त्यांनी अनेक गाणी गायली. त्याचबरोबर त्यांनी अनेक गाण्यांची निर्मितीही केली. प्रफुल्ल कर यांचा जन्म १९३९ मध्ये झाला होता. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या प्रफुल्ल यांनी भारतीय संगीत क्षेत्रात गीतकार, गायक, संगीत निर्देशक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २००४ मध्ये त्यांना जयदेव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याचप्रमाणे भारत सरकारनेही त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कारान प्रदान केला होता. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांनी ओडिया संस्कृती आणि संगीतातील योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील असे सांगितले. “श्री प्रफुलकर जी यांच्या निधनाने मी दु:खी झालो आहे. ओडिया संस्कृती आणि संगीतातील त्यांच्या अग्रेसर योगदानासाठी त्यांचे स्मरण केले जाईल. विविध त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती. अशा शब्दात आपल्या त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.”

या निधनाबद्दल  ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही शोक व्यक्त केला आणि या घटनेने ओडिया संगीताच्या एका युगाचा अंत झाल्याचे सांगितले. “प्रसिद्ध संगीतकार प्रफुल कर यांच्या निधनाबद्दल जाणून घेतल्याने मला खूप दुःख झाले. त्यांच्या जाण्याने ओडिया संगीत जगतातील एका युगाचा अंत म्हणून पाहिले जाईल. प्रफुल्लच्या अनोख्या संगीत शैलीने ते कायमचे लोक-वक्ते बनले आहेत. ते त्यांच्या हृदयात अमर झाले आहेत. त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबाला मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

HAPPY BIRTHDAY : पतीला अद्दल घडवण्यासाठी पूनम ढिल्लो यांनी केले ‘असे’ काही, स्वतःचेच आयुष्य झाले बरबाद

…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं पाहातच राहिले

BIRTHDAY SPECIAL : चित्रपट कारकिर्दीत यांचे नाव तर गगनाला भिडले, परंतु खाजगी आयुष्यात त्या शेवटी एकट्याच राहिल्या

हे देखील वाचा