Friday, July 5, 2024

KK Death | केकेंना ट्रोल केल्यामुळे येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, रुपांकर बागचीला सर्वांसमोर मागावी लागली माफी

दिवंगत गायक ​​केके (KK) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे लोकप्रिय बंगाली गायक रुपांकर बागची (Rupankar Bagchi) सध्या अडचणीत आले आहेत. केकेच्या मृत्यूच्या काही तास आधी रुपांकर बागची यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी विचारले होते की केके कोण आहे? आपण कोणत्याही केकेपेक्षा चांगले गाऊ शकतो. या पोस्टनंतर काही तासांनी केके यांच्या मृत्यूची बातमी आली.

यानंतर रुपांकर बागची यांच्या या पोस्टवरून त्यांना प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले. एवढेच नाही, तर गायकाला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळू लागल्या. रुपांकर यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. या सर्व प्रकारानंतर रुपांकर बागची यांना केकेवरील त्यांची पोस्ट डिलीट तर करावी लागलीच, पण पत्रकार परिषद घेऊन दिवंगत गायकाच्या कुटुंबीयांची माफीही मागावी लागली. (singer rupankar bagchi has issued an unconditional apology to late singer kk family)

बंगाली गायकाने मागितली केकेच्या कुटुंबीयांची माफी
पत्रकार परिषदेत रुपांकर बागची म्हणाले, “दिवंगत गायक केके यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून माझा एक व्हिडिओ चर्चेचा विषय होता, जो मी फेसबुकवरून डिलीट केला आहे. केकेच्या कुटुंबीयांशी मी परिचित नाही, पण मला तुमच्या माध्यमातून सांगायचे आहे की मला माफ करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.”

केकेच्या गायनावर प्रश्नचिन्ह लावणे रूपांकर बागचीला पडले महागात
यासोबतच रुपांकर बागची पुढे म्हणाले की, “माझ्या संपूर्ण गायनाच्या कारकिर्दीत मला कधीही अशा भीतीचा सामना करावा लागला नाही. माझे संपूर्ण कुटुंब भयभीत आहे. आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माझ्या पत्नीला फोनवर सतत धमक्या येत आहेत. माझ्या गायनाला देश-विदेशात खूप प्रेम मिळाले. माझा एक निष्काळजीपणा हे रूप घेईल, हे कोणास ठाऊक. मी याची कल्पनाही केली नव्हती.”

आपल्या पत्रकार परिषदेत रुपांकर बागची म्हणाले, “केकेशी माझे कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते आणि असे काही होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या कॉन्सर्टनंतर आपण त्यांना गमावू, हे कोणास ठाऊक होते. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबद्दल वाईट बोलण्याचा माझा हेतू नव्हता. यामुळे माझे कुटुंबीय आणि चाहते दुखावले गेले असतील, तर मी याबद्दल माफी मागतो.”

दरम्यान कॉन्सर्टनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने केके यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे चाहते आणि संपूर्ण इंडस्ट्री धक्क्यात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा