Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड मिका सिंगाचे स्वयंवर होस्ट करण्यासाठी गायक शान आणि खूप उत्साही म्हणाला, ‘मी कित्येक लग्न जुळवली आहेत’

मिका सिंगाचे स्वयंवर होस्ट करण्यासाठी गायक शान आणि खूप उत्साही म्हणाला, ‘मी कित्येक लग्न जुळवली आहेत’

शान (Shaan)  हा हिंदी संगीत जगतातील सर्वात लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. आपल्या जादूई आवाजाने त्याने अनेक गाणी गायली आहेत जी प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. आता बऱ्याच कालावधीनंतर शान पून्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सदाबहार रोमँटिक गाण्यांसाठी ओळखला जाणारा गायक शान आगामी रिअलिटी शो ‘स्वयंवर- मिका दी वोहटी’ होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. शान 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा रिअलिटी शो होस्ट करण्यासाठी परतत आहे. या रिअलिटी शोच्या माध्यमातून गायक मिका सिंगला (Mika singh)  त्याचा जीवनसाथी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 

हा कार्यक्रम मिकासाठी खूप उत्साहाचा असणार असला तरी, शान याबद्दल चिंताग्रस्त आहे कारण त्याला माहित आहे की, हा केवळ शो नसून दोन लोकांच्या आयुष्याचा विषय आहे. मात्र, शानला अजूनही हा शो होस्ट करायचा आहे. एका मुलाखतीदरम्यान शानने दावा केला की ही जबाबदारी घेण्यासाठी तो योग्य व्यक्ती आहे. एका मुलाखतीत बोलताना शानने या कार्यक्रमाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. यासोबतच त्याने होस्ट करणार असल्याने आनंदही व्यक्त केला आहे.

याबद्दल बोलताना शान म्हणाला की, “मी पूर्वी डान्सिंग, होस्टिंग आणि इतर गोष्टी केल्या आहेत पण आता मी जे करणार आहे ते त्या सर्वांपेक्षा खूप वेगळे आहे. ‘स्वयंवर’ या शोच्या सूत्रसंचालनासाठी माझी निवड का करण्यात आली याचे मला आश्चर्य वाटायचे, पण जेव्हा मला कळले की माझा भाऊ मिकाला वधू मिळणार आहे, तेव्हा मला वाटले, ‘त्याला मदत करण्यात मी मागे कसे राहू? मी त्याला इतरांपेक्षा चांगले ओळखतो, मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे, त्याच्यासोबत चित्रपट आणि रिअॅलिटी शो केले आहेत. त्याने माझ्या वाढदिवसाची पार्टी त्यांच्या घरी आयोजित केली होती.”

तो पुढे म्हणाला की “मला नात्यांमध्ये खूप रस आहे आणि कोणत्याही विषयावर मित्रांना सल्लाही देतो. मी अनेक विवाह तुटल्यापासून वाचवले आहेत, मी समुपदेशनही करतो. मी लोकांना सल्ला देऊ शकतो किंवा मला समुपदेशनाची गरज आहे का ते पाहू. मी ते मनापासून करेन कारण हा केवळ कार्यक्रम नसून कोणाच्या तरी आयुष्याशी संबंधित आहे.” दरम्यान याआधीही स्वयंवराचे अनेक कार्यक्रम टीव्हीवर आले होते. याची सुरूवात राखीच्या स्वयंवर पासून झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 हेही वाचा-

हे देखील वाचा