×

केजीएफच्या यशानंतर अभिनेता यश दिसला कुटुंबासोबत बीचवर मस्ती करताना, बायकोसोबत झाला रोमँटिक

केजीएफ २ सिनेमा प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर एकच कल्ला झाला. केजीएफ २ सिनेमाची प्रत्येक सिनेप्रेमी आतुरतेने वाट बघत होता. अखेर हा सिनेमा आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचा एकच तडाखा लावला. केजीएफ २ सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सिनेमातील सर्वच कलाकार आणि टीम प्रचंड खुश असून, हा आनंद सर्वच कलाकार साजरा करताना दिसत आहे. केजीएफ २ सिनेमातील स्टार अभिनेता यश देखील या सिनेमाच्या यशामुळे खुश असून, सध्या तो त्याच्या कुटुंबासोबत हा आनंद साजरा करत आहे.

यशाची पत्नी असलेल्या राधिका पंडितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या फॅमिली ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, ते अतिशय सुंदर अशा बीच असलेल्या लोकेशन्सवर दिसत असून, राधिका आणि यश एकमेकांसोबत रोमॅंटिक वेळ घालवत आहे. राधिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि यश अतिशय सुंदर दिसत असून, दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहे. एक फोटोमध्ये यश राधिकाला किस करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika Pandit (@iamradhikapandit)

या फोटोंमध्ये आपण पाहिले तर हे दोघं टॉपिकल ट्विनिंग करताना दिसत आहे. राधिकाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “कलर्ड चष्म्यातून पाहत आहे.” या पोस्टवर यशाच्या फॅन्सच्या एकामागोमाग एक अशा असंख्य कमेंट्स येत आहे. अनेकांनी त्या दोघांच्या जोडीला आशीर्वाद दिला आहे तर काहींनी या जोडीला नजर लागू नये म्हणून प्रार्थना केली आहे. यासोबतच राधिकाने तिच्या मुलांसोबतचा देखील त्यांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात यश आणि राधिका त्यांच्या मुलांसोबत बीचवर माती मध्ये खेळताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika Pandit (@iamradhikapandit)

तत्पूर्वी यशचा केजीएफ चॅप्टर २ हा सिनेमा भारतातला सहावा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने संपूर्ण भारतात तब्ब्ल ८८३ कोटी कमाई केली आहे. या सिनेमात यशसोबतच श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन यांचादेखील मुख्य भूमिका आहेत. संजय दत्तने या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारली आहे.

हेही वाचा-

Latest Post