Wednesday, July 3, 2024

किती गोड! आईच्या कडेवर बसलेल्या श्रेया घोशालचा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

श्रेया घोशाल (Shreya Ghoshal) ही संगीत क्षेत्रातील अनमोल व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या जादुई आवाजाने सगळ्यांनाच तिने मंत्रमुग्ध केले आहे. गेली अनेक दशके श्रेयाची गाणी हिंदी आणि मराठी चित्रपट जगतात धुमाकूळ घालत आहेत. ती जितकी तिच्या आवाजासाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. श्रेयाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे ज्यांच्याशी ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या श्रेयाचा बालपणीचा एक फोटो आणि तिने आईसाठी लिहलेली एक सुंदर पोस्ट सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे, कोणती आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ.

गायिका श्रेया घोशालने नुकताच आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला. याच निमित्ताने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिने आईच्या कडेवर बसलेला बालपणीचा तिचा क्यूट फोटो शेअर केला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये आईच्या कडेवर बसलेली श्रेया खूपच गोंडस दिसत आहे. हे फोटो शेअर करत श्रेयाने “आई तु असलीस की सगळं चांगलं होत. तु माझी जिवलग मैत्रीण, माझे प्रेरणास्थान, माझ हृदय आहेस. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे” अशा शब्दात आईसाठी सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या श्रेयाची ही पोस्ट सगळीकडे व्हायरल होत असून तिच्या या क्यूट फोटो वर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, प्रसिद्ध गायिका श्रेया घोशालचा जन्म १२ मार्च १९८४ मध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासुन श्रेयाने आपल्या गायनाला सुरुवात केली होती. टीव्हीवरील ‘सारेगमप’ या कार्यक्रमातून श्रेयाने संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले होते. देवदास चित्रपटातून तिने हिंदी संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. सध्या श्रेया घोशालही आघाडीची लोकप्रिय गायिका म्हणून प्रसिद्ध आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा