Sunday, April 14, 2024

नागराज मंजुळेंचा नाद भरी प्रवास! आधी ॲक्टर मग डायरेक्टर आता थेट डॉक्टर

दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांच्या कामाने चित्रपटसृष्टीत खास अशी जागा निर्माण केली आहे. त्यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत खास जागा निर्माण केली. त्यांच्या या चित्रपटाने १०० कोटीपेक्षाही जास्त गल्ला केला. हिंदीमध्ये देखील या चित्रपटाचा रिमेक बनवला आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये देखील चांगले नाव कमावले. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांच्या नावापुढे आता डॉक्टर या पदवीची देखील पाटी लागणार आहे. 24 ऑगस्ट नागराज मंजुळे यांचा वाढदिवस, पाहूया त्यांचा यशस्वी सिनेप्रवास. 

नुकताच आता नागराज मंजुळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाने सन्मान केला आहे. त्याचवेळी मंजुळे यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नागराज मंजुळे हे नेहमीच एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. समाजातील एखादा दुर्लक्षित घटक ते त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतात.

त्याचबरोबर नागराज मंजुळे यांनी आपल्या कारकीर्दीत केवळ लेखन आणि दिग्दर्शनच नाही, तर कित्येक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ते आपल्या कारकीर्दीत प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याविषयीचा नारा सोडण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या सहकार योगदानामुळे त्यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून D. Litt ही पदवी देण्यात देण्यात आली आहे.

नागराज मंजुळे यांनी आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यात ‘पिस्तुल्या’ (Pistulya), ‘फॅंड्री’ (Fandry), ‘सैराट’ (Sairat) आणि आता ‘झुंड’ (Jhund) अशा एकाहून एक सरस चित्रपटांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या अनेक चित्रपटांची निर्मिती करत मंजुळे यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

हेही वाचा –
वाढदिवस विशेषः अवघ्या महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या नागराज मंजुळेंचा थक्क करणारा प्रवास
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यश मिळवणारे विजय चव्हाण; ‘मोरूची मावशी’ नाटकाने मिळवून दिली ओळख

हे देखील वाचा