Tuesday, March 5, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध गायकाच्या वडिलांच्या घरी झाली मोठी चोरी, तब्बल ७२ लाख केले लंपास

हिंदी सिनेसृष्टीमधे आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांचीच मने जिंकून घेणारा लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक म्हणजे सोनू निगम. सोनू नेहमीच त्याच्या विविध गाण्यांमुळे, कॉन्सर्टमूळे आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतो. कधीकधी त्याचे बोलणेच त्याला विविध वादांमध्ये अडकवत असते. अशाच सोनू निगमशी संबंधित एक बातमी समोर येत आहे. अगदी सोनू नाही मात्र सोनूच्या वडिलांसंदर्भात एका घटनेमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. सोनूचे वडील गायक अगम कुमार निगम यांच्या घरी मोठी चोरी झाली आहे. या चोरीनंतर पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली गेले आहे.

प्राप्त माहितीनुसार अगम कुमार निगम यांच्या घरातून तब्बल ७२ लाखांची चोरी झाली आहे. सोनू निगमच्या वडिलांनी अगम निगम यांनी पोलिसांना त्यांना रेहानवर संशय असल्याचे सांगितले आहे. रेहान हा त्यांच्याकडे आधी ड्रायव्हर म्हणून काम करायचा. मुंबईमधील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये अगम कुमार निगम यांनी दिलेल्या माहितीनुसार रेहानवर कलम ३८०, ४५४ आणि ४५७ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. सोबतच आता पोलिसांनी रेहानचा शोध घ्यायला देखील सुरुवात केली आहे. मात्र अजूनपर्यंत या प्रकरणावर सोनू निगमने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

तत्पूर्वी रेहान हा निगम यांच्याकडे आठ महिने काम करत होता, मात्र त्याचे काम चांगले नसल्याने त्याला काढून टाकण्यात आले होते. २० मार्च रविवारी रोजी सोनू निगमचे वडील वर्सोवा येथे गेले होते. तिथून परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या डिजिटल लॉकरमधून तब्बल ४० लाखांची रक्कम चोरीला गेली आहे. त्यांनी लगेच ही बाब फोन करून त्यांच्या मुलीला सांगितली. दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या मुलाच्या घरी व्हिसा कामासाठी गेले होते. तिथून परतल्यावर पुन्हा त्यांना त्यांच्या लॉकरमधून आणखीन ३२ लाख गायब झालेले दिसले.मात्र त्या लॉकरचे कोणतेही नुकसान झालेले नव्हते.

त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांचा पहिला ड्रायव्हर रेहान हातात बॅग घेऊन दोन्ही दिवस ते घरी नसताना त्यांच्या घराकडे जाताना दिसला. त्याने डुप्लिकेट चावी वापरून त्यांच्या घरी घुसून चोरी केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान सोनू निगमचे वडील अगम कुमार निगम देखील चांगलेच लोकप्रिय गायक आहेत. त्यांचा २००५ साली एक म्युझिक अल्बम देखील प्रदर्शित झाला होता. ज्याचे नाव ‘बेवफा’ होते. या अल्बममधील सर्वच गाणी तुफान गाजली. आजही त्यांची या अल्बममधील गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा