आपल्या आवाजाने तरुणाईला वेड लावणाऱ्या गायकांमध्ये सोनू निगमचा आवर्जुन उल्लेख केला जातो. सोनूने आजपर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे, सोनू आपल्या आवाजाव्यतिरिक्त आपल्या हँडसम लूकसाठीही ओळखला जातो. त्याने गायनाव्यतिरिक्त अभिनयातही आपला हात आजमावला आहे. सोनू नेहमीच आपल्या कामामुळे चर्चेचा विषय ठरत असता. मात्र, त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत कमीच असते. तुम्हाला हे माहिती आहे का? की, सोनूची पत्नी जरी कॅमेऱ्यासमोर खूप कमी वेळा आली असेल, पण ती जेव्हाही एखाद्या सोहळ्यात जाते, तिथे ती भल्या-भल्या बॉलिवूड अभिनेत्रींना आपल्या सौंदर्यापुढे मागे टाकते.
आयडल जोडपं आहेत सोनू आणि मधुरिमा
सोनू आणि त्याची पत्नी मधुरिमाकडे चाहते आयडल जोडपं म्हणून पाहतात. दोघेही नेहमीच आपले खासगी आयुष्य नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करतात. मात्र, जेव्हाही सोनू कोणत्या पुरस्कार सोहळ्यात जातो, तेव्हा मधुरिमाही नेहमी त्याच्यासोबत दिसते. (Singer Sonu Nigam Wife Madhurima Nigam Is Very Bold And Beautiful Makers Kareena Katrina Fail)
अशी झाली होती भेट
सोनू आणि मधुरिमाची लव्हस्टोरीही कोणत्याही चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघांचीही पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी १५ फेब्रुवारी, २००२ रोजी लग्नगाठ बांधली होती.