Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड ‘हनुमान चालिसा’ गाण्याच्या शूटिंगमध्ये बूट घालून वादात अडकला सुखविंदर सिंग, ट्रोल होताच म्हणाला….

‘हनुमान चालिसा’ गाण्याच्या शूटिंगमध्ये बूट घालून वादात अडकला सुखविंदर सिंग, ट्रोल होताच म्हणाला….

सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग (Sukhwinder Singh) आपल्या जादुई आवाजाने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. त्याने आपल्या करिअरमध्ये केवळ बॉलिवूडच नाही, तर अनेक पंजाबी गाणी गायली आहेत. मात्र अलीकडेच सुखविंदर सिंग त्याच्या एका गाण्याच्या शूटिंगच्या निमित्ताने वादात सापडला आहे. यामुळे हा वाद आणखीनच वाढला कारण लोकांनी याला धार्मिक भावना दुखावणारे म्हटले.

हनुमान चालिसा करताना घातलेले बूट
प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग वाराणसीच्या चेत सिंग घाटावर हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करत होता. यादरम्यान प्रसिद्ध गायक गीतकार आणि संगीतकार सुखविंदर सिंग बूट घालून नाचताना दिसला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला.

प्रत्येकाने घातले होते बूट
विशेष बाब म्हणजे या गाण्याच्या शूटिंगदरम्यान केवळ सुखविंदर सिंगच नाही, तर सर्वच जण बूट घालून डान्स करताना दिसले. अशा परिस्थितीत सुखविंदर आणि त्याच्या सहकलाकाराच्या ‘हनुमान चालिसा’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान शूज घालून नाचणे युजर्सना आवडले नाही. लोकही याला हिंदू धर्माचा अपमान मानत आहेत. त्यानंतर या गायकाला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

सुखविंदर सिंगने केले स्पष्ट
या प्रकरणाने पेट घेतल्यावर गायक सुखविंदरने तात्काळ याप्रकरणी मौन सोडले आणि आपले स्पष्टीकरण दिले. माध्यमांतील वृत्तानुसार, सुखविंदर म्हणाला की, “असे केल्याने जर एखाद्याची भावना कमी होत असेल तर ते सिद्ध करा. भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.”

वाराणसीमध्ये शूटिंग
सुखविंदर सिंगचा हा आगामी म्युझिक व्हिडिओ ‘हनुमान चालिसा’ वाराणसीच्या अनेक घाटांवर शूट केला जात आहे. याशिवाय अनेक मंदिरांमध्येही या गाण्याचे चित्रीकरण सुरू आहे. ज्यामध्ये संकट मोचन मंदिर, नंदेश्वर घाट, चेत सिंह किल्ला आणि दशाश्वमेध घाट यांचा समावेश आहे. या म्युझिक व्हिडिओची निर्मिती प्रवीण शहा, सगुण वाघ, विरल शाह जीत वाघ आणि चिरण भुवा यांनी केली आहे. यासोबतच याचे दिग्दर्शन राजीव खंडेलवाल यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा