सुखविंदर सिंग यांनी वाराणसीमध्ये चप्पल घालून हनुमान चालीसा म्हटल्यामुळे नव्या वादाला फुटले तोंड

कलाकरांना घेऊन कधी कोणता वाद निर्माण होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियाच्या काळात तर कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रमाण अधिकच वाढताना दिसत आहे. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक असणाऱ्या सुखविंदर सिंग यांना घेऊन एक मोठा वाद उभा राहिला आहे. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि हिट गायक म्हणून सुखविंदर सिंग ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या दमदार आवाजाने आणि हटके स्टाईलने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून ते त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. आज याच सुखविंदर सिंग यांना घेऊन एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sukhwinder Singh (@sukhwindersinghofficial)

सध्या सुखविंदर सिंग वाराणसीमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी चप्पल घालून हनुमान चालीसा म्हटल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. सुखविंदर आणि त्यांच्या सहकलाकारांच्या टीमने एका मोठ्या ग्रुपच्या भक्ती संगीताच्या व्हिडिओसाठी वाराणसीच्या चेतसिंग घाटावर ‘हनुमान चालीसा’वर गंगेमध्ये होडीत बसून शूटिंग केली. याच शुटिंगवेळी त्यांनी चप्पल घातलेली दिसून आली. यावर तिथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. मात्र यावर सुखविंदर यांनी त्यांना प्रतिप्रश्न करत विचारले की. “चप्पल घालून हनुमान चालीसा म्हटल्यावर तुमच्यात असलेली भक्तीची भावना कमी होते का?” यावर तिथे शूटिंग बघणाऱ्या लोकांनी आक्षेप घेत त्याला चुकीचे म्हटले. त्याचे याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर नेटकाऱ्यानी देखील त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या व्हिडिओमध्ये सुखविंदर सिंग हे हनुमान चालीसाचा पाठ करत हातात भगवा झेंडा आणि डान्स करणाऱ्या अनेक डान्सरसोबत गंगा घाटावर दिसत आहे. हे दृश्य वाराणसीचे असून, त्यांच्यासोबत डान्स करणाऱ्या कलाकारांनी देखील शूटिंगच्या वेळेस चप्पला घातल्या आहेत. या गाण्याची शूटिंग अजून “संकट मोचन मंदिर, नंदेश्वर घाट, चेतसिंह किला आणि घाट, दशाश्वमेध घाट आणि गंगा आरती यांच्यासोबत सुद्धा होणे बाकी आहे. मात्र याआधीच हा वाद आता समोर आला आहे.

तत्पूर्वी सुखविंदर सिंग यांना त्यांच्या स्लमडॉग मिलिनियरमधील ‘जय हो’ गाण्यासाठी अकादमी पुरस्काराने तर ‘छैय्या छैय्या’, ‘चक दे ​​इंडिया’, ‘हौले हौले’, ‘कर हर मैदान फतेह’, ‘बनठन’ या गाण्यांसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

Latest Post