Thursday, July 18, 2024

‘इंडियन आयडॉल ही माझ्यासाठी एक भावना आहे,’ विशाल दादलानी यांनी केले इंडियन आयडॉलबाबत मत व्यक्त

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोने देशातील नव्या-कोवळ्या आवाजांसाठी आणि संगीत क्षेत्रात मर्दुमकी गाजवण्याची आकांक्षा उरी बाळगणाऱ्या होतकरू गायकांसाठी लॉन्चपॅडचे काम केले आहे. या शोच्या आगामी सत्रात संगीतकार आणि गायक विशाल दादलानी पुन्हा एकदा परीक्षक म्हणून दिसणार आहे आणि यावेळी त्याच्या सोबत असेल राष्ट्रीय पुरस्कार विजेती, गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल आणि बॉलीवूडचा मेलडी किंग कुमार सानू.

एक आवाज, लाखों एहसास’ हे या सत्राचे अभियान आहे ज्यामध्ये एका अशा जादुई आवाजाचा शोध घेण्यात येईल, जो श्रोत्यांना नानाविध भावनांचा अनुभव आपल्या गाण्यातून करून देण्यास सक्षम असेल. या शोच्या नवीन प्रोमोने देशाच्या भावी गायकांसाठी मंच सज्ज केला आहे आणि या शो च्या 14 व्या सीझनने हा सीझन प्रेक्षकांसाठी ‘म्युझिक का सबसे बडा त्योहार’ असेल अशी हमी दिली आहे!

पुन्हा एकदा परीक्षकाची भूमिका निभावत असलेला विशाल दादलानी म्हणतो, “मी नेहमीच म्हणतो की, इंडियन आयडॉल ही माझ्यासाठी एक ‘भावना’ आहे. संगीत एक सार्वत्रिक भाषा आहे, जी सर्व मर्यादा ओलांडते. आपल्या अतुल्य देशातील काना-कोपऱ्यातून उत्तमोत्तम प्रतिभा शोधून काढण्याचे अनोखे कसब या शोमध्ये आहे. या लक्षणीय प्रवासात पुन्हा एकदा सहभागी होताना आणि 14 व्या सीझनच्या माध्यमातून अपवादात्मक गायन प्रतिभेचा खजिना शोधताना मला खूप आनंद होत आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘या’ ठिकाणी पार पडणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचा राजेशाही लग्नसोहळा, संपूर्ण दिवसाने नियोजन जाणून घ्या एका क्लिकवर
शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला पायरेसीचा धोका, निर्मात्यांनी केली तक्रार दाखल
‘सिंगल’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

हे देखील वाचा