बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे सिंघम. या चित्रपटाच्या सीक्वलला म्हणजेच ‘सिंघम रिटर्न्स’ला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘सिंघम ३’च्या प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत. यामधील पोलिसाची भूमिका अभिनेता अजय देवगण निभावणार असून खलनायकाच्या भूमिकेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शेट्टीच्या ‘सिंघम ३’ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. अभिनेता अर्जुन कपूर ‘सिंघम ३’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूक सध्या व्हायरल होत आहे. अर्जूनचा हा लूक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अर्जुनचा भयानक अवतार चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. अर्जुनच्या हातात एक मोठा कोयता पाहायला मिळत असून त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे शिंतोडे उडालेले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अर्जुनने रणवीर सिंगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
अर्जूनचा हा लूक पाहून चाहते मजेशीर कमेंट करत आहते. एका युजरने ‘आंखों से नहीं, लुक से गोली मार रहे हो’. तर दुसऱ्या एका युजरने असा लूक पाहून कोणाला भिती नाही वाटणार. तर काही युजर्सनी अर्जुनला चांगला अभिनय करण्याचा सल्ला दिला आहे.
२०११मध्ये ‘सिंघम’ प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१४ साली ‘सिंघम २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता १० वर्षांनी ‘सिंघम ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि आता सिंघम ३ यावर्षी प्रदर्शित होणार आहे.
अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अर्जुन कपूरने ‘इशकजादे’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘कुत्ते’, ‘कि अँड का’, ‘२ स्टेट्स’, ‘गुंडे’ या चित्रपटांत झळकला. अर्जुनने ‘पानीपत’ चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शिवरायांचा छावा १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित, वाचा सविस्तर
मलायकाला राग अनावर; CM शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी, काय आहे प्रकरण?