Saturday, June 29, 2024

‘सिर्फ तुम’मध्ये दिसणार नाही विवियन डिसेनाची ऑन-स्क्रीन आई शालिनी कपूर, ‘या’ कारणामुळे सोडला शो

विवियन डिसेना (Vivian Dsena) स्टारर शो ‘सिर्फ तुम’ लवकरच बंद होणार आहे. हा शो टीव्हीवरून ओटीटीवर दाखवला जाईल, असे बोलले जात आहे. जे शोसाठी चांगले लक्षण नाही. मात्र, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, शोमध्ये मुख्य भूमिकेत असणारी ममता ओबेरॉय उर्फ ​​शालिनी कपूरने (Shalini Kapoor) शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या शोमध्ये ती विवियनच्या आईची भूमिका साकारत आहे. मात्र, आता ती या शोमध्ये दिसणार नाही. अलीकडेच अभिनेत्रीने शो सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.

‘कुबूल है’मध्ये काम केलेल्या शालिनी कपूरने साधताना सांगितले की, ती चांगल्या टर्म्सवर शो सोडत आहे. ती म्हणाली, “मी आवडीने शो सोडला आहे, माझे पात्र आणि ट्रॅक पूर्ण झालेला नाही. यामागचे कारण म्हणजे, माझे मुलगा रणवीरसोबतचे सीन आहेत. विवियन काही काळापासून शोमध्ये नाही आणि त्यामुळे माझ्या भूमिकेत कोणताही महत्त्वाचा सीन नाही. या शोमध्ये आई-मुलाची जोडी पाहायला लोकांना खूप आवडले. मला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असे. पण आता तिथे फारसे काही होत नसल्याने, शोमधून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटले. मी चांगल्या अटींवर शो सोडत आहे.” (sirf tum actress shalini kapoor told the reason for quiting the show)

शालिनी कपूरला जेव्हा विचारण्यात आले की हा शो टीव्हीवरून ओटीटीवर का येत आहे, तेव्हा तिने यावर तिची चिंता व्यक्त केली आहे. ती म्हणाला, “एक अभिनेत्री म्हणून मला फारसा त्रास होत नाही. पण मला वाटते, शो म्हणून हे चांगले लक्षण नाही. मात्र, हे कोणत्याही शोमध्ये होऊ शकते. शोसाठी काय काम करू शकते आणि काय नाही हे कोणालाच माहीत नाही.” तसेच, या क्षणी शालिनी कपूरला नवीन प्रकल्प हाती घेण्याची घाई नाही, परंतु ती एका चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा