Monday, July 8, 2024

सिद्धार्थच्या निधनानंतर ४ दिवसांनी भरवली ‘प्रार्थना सभा’, सिस्टर शिबानींनी सांगितला ‘त्या’ रात्रीचा प्रसंग

‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने २ सप्टेंबरला या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी सोशल मीडियावर सर्वत्र सिद्धार्थच दिसत होता. त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहत होते. त्याच्या निधनाने त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते पूर्णपणे हादरून गेले होते. अशात आता सोशल मीडियावर ‘धन्यवाद रीता आई’ असा हॅशटॅग ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या बहिणी आणि आईने ६ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता एक प्रार्थना सभा आयोजित केली होती. ही सभा ब्रम्हकुमारी आश्रमामध्ये ठेवण्यात आली होती. या सभेला सिद्धार्थचे चाहते आणि त्याच्या जवळची माणसे आली होती. तसेच बॉलिवूडमधील देखील काही मंडळी इथे हजर होती. सिद्धार्थच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठीच ही प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती. (Sister Shibani reveal what Rita maa said after sidharth death)

या सभेमध्ये सिद्धार्थचा मित्र पारस छाबडा देखील आला होता. त्याने या प्रार्थना सभेचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी ब्रम्हकुमारी आश्रमाच्या सिस्टर शिबानी त्या रात्री सिद्धार्थच्या आई बरोबर त्यांचा झालेला संवाद सांगत होत्या. त्या म्हणत होत्या की, “मी २ तारखेला रात्री रीता ताई अर्थातच सिद्धार्थच्या आईला फोन केला होता, तेव्हा फोन उचलून त्या म्हणाल्या ओम शांती, त्यांनी म्हणलेल्या ओम शांतीमध्ये एवढी शक्ती होती, एवढी ताकत होती की, मी म्हणाले देवा ही कोणती शक्ती आहे जी एका आईच्या तोंडून या शब्दांमध्ये ऐकू येत आहे. त्यांना मी विचारलं, रीता ताई तुम्ही ठीक आहात ना?, तेव्हा त्या म्हणाल्या माझ्याकडे परमात्माची शक्ती आहे. किती महान आत्मा आहे. ज्याची आई अशा परिस्थितीमध्ये देखील एकाच निर्धारावर ठाम होती. त्या म्हणाल्या, तो जिथे कुठे जाईल तिथे तो खुश असेल.”

हा व्हिडीओ पोस्ट करत पारस म्हणाला की, “रीता काकी देव तुम्हाला अजून शक्ती देवो, आणि हे ऐकून मला देखील थोडी ताकत मिळाली आहे. या सुंदर सभेसाठी खूप धन्यवाद.” या प्रार्थना सभेमध्ये सिद्धार्थच्या आयुष्यातील ब्रम्हकुमारी आश्रमामधील काही आठवणी दाखवण्यात आल्या. यामुळे सिद्धार्थचे चाहते थोडे आनंदी दिसले. सर्वांचं मन हलकं झालं. यानंतर अनेकांनी ‘धन्यवाद रीता आई’ अशी पोस्ट शेअर केली. सध्या ‘धन्यवाद रीता आई’ हा हॅशटॅग चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

हे देखील वाचा