Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

पांढऱ्या ब्रालेटमध्ये कमाल दिसतेय स्मिता गोंदकर, हॉट पोझने वेधले चाहत्यांचे लक्ष

‘पप्पी दे पारूला’ म्हणत एका चेहऱ्याने लाखो हृदय चोरले. तो चेहरा म्हणजेच अभिनेत्री स्मिता गोंदकर. तिचे हे गाणे प्रचंड हिट ठरले. शिवाय या अल्बम गाण्याने तिला तूफान लोकप्रियताही मिळवून दिली. आजही प्रेक्षक जेव्हा हे गाणे ऐकत असतील तर नक्कीच स्मिताचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येत असणार. ती सतत वेगवेगळे अल्बम सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शिवाय अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळेही बरीच चर्चेत असते.

अलीकडेच स्मिताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या चाहत्यांला वेड लावत आहेत. या फोटोमध्ये स्मिता प्रचंड हॉट दिसत आहे. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि हिरवी पँट घातली आहे. तुम्ही पाहू शकता की, यात ती अतिशय दिलखेचक पोझ देताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खास पसंत पडल्याचे दिसून येत आहे.

हे फोटो शेअर करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही यासाठी पात्र आहात.” यावर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत या हॉट फोटोला १६ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहते अजूनही यावर लाईक्सचा पाऊस पाडताना दिसत आहेत.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. शिवाय तिचे अल्बम सॉंग सतत रिलीझ होत असतात. स्मिता मराठी बिगबॉसच्या दोन्ही सीझनमध्ये झळकली आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. याठिकाणी तिचे ५ लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा