Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

बीचवरून व्हायरल होतायेत स्मिता गोंदकरचे ‘हे’ हॉट फोटो; एक नजर टाकाच

‘पप्पी दे पारूला’ मध्ये थिरकत अभिनेत्री स्मिता गोंदकरने लाखो हृदय चोरले. हे गाणे चाहत्यांमध्ये चांगलेच गाजले. सोबतच या गाण्याने तिला तूफान लोकप्रियताही मिळवून दिली. यातील तिची हॉट स्टाईल त्यावेळी बरीच चर्चेत होती. आजही हे गाणं त्याच आवडीने ऐकलं जातं. तेव्हापासून स्मिताच्या फॅन फॉलोविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली.

अभिनेत्री आता सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. इथे ती तिचे सुंदर सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच स्मिताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांचेही भान हरपले आहे. या फोटोमध्ये स्मिता बऱ्यापैकी हॉट दिसत आहे. फोटोत तिने काळ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स परिधान केलेले पाहायला मिळत आहे. या लूकमध्ये स्मिताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्मिता बीचवर तिचा वेळ घालवत आहे. हे फोटो देखील तिने बीचवरून पोस्ट केले आहेत. तिच्या बॅकग्राऊंडमध्ये निळेशार समुद्र आपण सहज पाहू शकतो. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. कमेंट बॉक्समध्ये फायर ईमोजीचा पाऊस पडलेला दिसत आहे. (smita gondkar shared hot photo from beach see here)

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. स्मिता मराठी बिगबॉसच्या दोन्ही सीझनमध्ये झळकली आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. याठिकाणी तिचे ५ लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा