Thursday, June 13, 2024

अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्याची शूटिंग केल्यानंतर ‘या’ करण्यासाठी रात्रभर रडल्या होत्या स्मिता पाटील

हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय प्रतिभावान आणि देखणी अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील ओळखल्या जातात. ८० च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी, मराठी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘बाजार’, ‘अर्थ’, ‘आक्रोश’, ‘उंबरठा’ आदी त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांची नावे. त्यांनी खूप कमी वयात मोठे यश मिळवत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचा गाजलेला सिनेमा म्हणजे ‘नमक हलाल’. या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. सिनेमातील ‘आज रपट जाए’ गाण्याला तर अमाप लोकप्रियता मिळाली. याच गाण्याशी संबंधीत एक किस्सा खूपच गाजला होता.

नमक हलाल सिनेमातील ‘आज रपट जाए’ या गाण्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक रोमॅंटिक सीन दिले होते. पावसात भिजताना त्यांचे अनेक मादक सीन शूट केले जाणार होते. मात्र यासाठी स्मिता तयार नव्हत्या. मात्र काम आहे करावे तर लागेल. स्मिता यांनी कशी तरी त्या गाण्याची शूटिंग पूर्ण केली आणि घरी जाऊन त्या खूप रडल्या. घरी गेल्यानंतर स्मिता यांनी आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि त्या रात्रभर रडल्या. त्यांना अमिताभ यांच्यासोबत रोमॅंटिक सीन केल्याचा खूपच पश्चाताप होत होता. यानंतर त्या खूप शांत झाल्या. जेव्हा ही गोष्ट अमिताभ यांना समजली तेव्हा अमिताभ यांनी स्मिता पाटील यांच्याकडे जात त्यांना सांगितले की, त्यांनी असे वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. ते सीन स्क्रिप्ट आणि गाण्याची डिमांड असल्यामुळे शूट करण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी स्मिता पाटील यांना खूपच कम्फरटेबल भावना दिली. त्यामुळे त्यांना ही बाब लक्षात आली आणि त्या सामान्य झाल्या. पुढे त्यांनी सर्व शूटिंग आनंदाने आणि मस्ती, मजेत केली. यानंतर स्मिता आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्री झाली. प्रकाश मेहरा दिग्दर्शित हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. दरम्यान स्मिता पाटील यांनी अभिनेते राज बब्बर यांच्याशी लग्न केले. मात्र मुलगा प्रतीकांच्या जन्मानंतर त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यांचे वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा