Monday, December 9, 2024
Home अन्य स्मृती ईराणी यांनी खिचडी केल्यानंतर बिल गेट्स यांनी दिली तिला फोडणी, नेटकरी म्हणाले ‘आता खरी चव…’

स्मृती ईराणी यांनी खिचडी केल्यानंतर बिल गेट्स यांनी दिली तिला फोडणी, नेटकरी म्हणाले ‘आता खरी चव…’

एखादा श्रीमंत व्यक्ती स्वयंपाक करत आहे, असे तुम्हाला समजले तर तुम्ही आधी काय विचार कराल? अरे यांच्या घरात कामं करायला लोकं नाही का? एवढे श्रीमंत असूनही ते का कामं करताय? मग जर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त काम करत असेल तेव्हा? हो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या बिल गेट्स यांनी नुकताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत मिळून स्वयंपाक केला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नुकतेच अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एका व्हिडिओ ट्विट केले आहे. या व्हिडिओमध्ये त्या माइक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी यांनी चक्क बिल गेट्स यांना खिचडीला फोडणी घालण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती या पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये मोहरी बिल गेट्स यांना टाकायला लावतात. त्यानंतर तयार झालेली फोडणी त्या खिचडीवर घालता आणि ती खिचडी मिक्स करून एका बाऊलमध्ये टाकून बिल गेट्स यांना खायला देतात. हा व्हिडिओ शेअर करताना स्मृती यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारतातील उत्तम अन्नाला आणि त्यातील पोषक तत्वांना ओळखताना…जेव्हा बिल गेट्स यांनी श्री अन्न खिचडीला फोडणी दिली.”

बिल गेट्स हे एका प्रसिद्ध संस्थेचे सह-अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत. भारत दौऱ्यात त्यांनी पोषण मोहिमेद्वारे सक्षमीकरणात भाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. या मोहिमेचा मुख्य उद्देश गर्भवती महिला आणि मुलांच्या पोषणाला प्रोत्साहन देणे हा आहे. या व्हिडिओशिवाय स्मृती इराणीने आणखी एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले, “नव्या भारतातील महिलांची क्षमता साजरी करत आहे.”

स्मृती इराणी यांच्या पोस्टवर नेटकाऱ्यानी कमेंट्स केल्या असून, त्यात एकाने लिहिले की, “अखेर खिचडीमध्ये चव आलीच”, दुसऱ्याने लिहिले, “हे खूप छान आहे. भारतच्या जुन्या पारंपरिक शाकाहारी जेवणात पूर्ण क्षमता आहे, हे जगासमोर आणले गेले पाहिजे.” सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकाऱ्यानी उत्स्फूर्त पद्धतीने कमेंट्स केल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ, व्हिडिओ झाला व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा