Monday, July 1, 2024

लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा

केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. 17 मार्च 2001 रोजी त्यांनी जुबिन इराणींसोबत लग्नाची गाठ बांधली होती. लग्नाच्या वाढदिवसनिमित्त त्यांना अनेक स्टार्सने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. स्मृती इराणी यांनी एक पोस्ट करून त्यांच्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांचे पती सोबतचे अनेक फोटो आहेत. या व्हिडीओला त्यांनी बॅकग्राउंड म्युझिक दिले आहे. ज्यात त्यांनी पती सोबतचा जीवन प्रवास दाखवला केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नाचे काही फोटो देखील आहेत. या व्हिडिओला शेअर करत त्यांनी असे लिहले आहे की,” दोस्ती, रोमांच ऑर धमाल के 20 साल.”

स्मृती इराणी यांना निर्माती एकता कपूरने देखील शुभेच्छा दिल्या. तिने त्या दोघांचा फोटो शेअर करत लिहले आहे की, “हॅपी एनिवर्सरी लव्ह बर्डस.”

तसेच स्मृती इराणी यांनी पतीला शुभेच्छा देताना असे म्हटले आहे की,” मी आता ही गोष्ट मान्य केली आहे की, मी काही साधारण व्यक्ती नाही की, जिच्या सोबत कोणीही सहजपणे राहू शकेल. मी कोणी सामान्य गृहिणी नाही. मी नेहमीच माझ्या स्वप्नांच्या मागे धावत असते. पण या सगळ्या दरम्यान तू मला शांत राहायला शिकवले आणि प्रत्येक गोष्टीत आनंद बघायला शिकवले. यासाठी मी तुझे आभार मानू शकते का?? कदाचित नाही, कारण मैत्रीमध्ये आभार नाही मनात.”  तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वतंत्र आयुष्यासोबत जबाबदारीची जाणीव करून देत ‘धक धक गर्ल’ माधुरीने मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाली…

-बच्चन कुटुंबाची लेक असूनही राहिली लाईमलाईटपासून दूर, बिग बींनी वाढदिवशी केले थ्रोबॅक फोटो शेअर

-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

हे देखील वाचा