बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे नेहमी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची संधी शोधत असतात. ते नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र, यातील काही फोटो असे असतात, जे चाहत्यांचे लक्ष आपसुकच वेधून घेतात. असेच काहीसे आता प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले आहे.
एका अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा शाळेतील फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ती अभिनेत्री लहानपणी कशी दिसत होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तापसी पन्नू आहे. काही दिवसांपूर्वीच तापसीने सोशल मीडियावर शाळेतील एक फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर तापसीच्या या फोटोला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
तापसीने हा शाळेतील फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिने शाळेचा ड्रेस घातला आहे आणि केसांच्या दोन वेण्याही घातलेल्या आहे. या फोटोमधील तापसी दोन वेण्यामध्ये खूप क्यूट दिसत आहे. तिच्या क्यूटनेसवर चाहते फिदा झाले आहेत. त्याचबरोबर या फोटोमध्ये तापसी प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेऊन उभी आहे, तर तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य देखील आहे.
त्याचबरोबर हा फोटो शेअर करत तापसीने कॅप्शन लिहिले की, “खूप वेगाने धावते… लहानपणापासूनच.” तापसीच्या या फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूडचे कलाकारही आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सो स्वीट.” काही चाहते तिला “खूप क्यूट,” म्हणत आहेत. आतापर्यंत या फोटोला ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.
तापसीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटामध्ये दिसली होती. ती लवकरच ‘शाबाश मिठू’, ‘लूप लॅपेटा’ आणि ‘रश्मी रॉकेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
-अभिज्ञा भावेचे स्टायलिश कॉर्पोरेट लूकमधील फोटो व्हायरल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की!’
-गुलाबी साडी नेसून आर्चीने घेतली ‘मिरर सेल्फी’; चाहत्यांना भावतोय अभिनेत्रीचा सोज्वळ अंदाज