Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड एक यशस्वी मॉडेल आणि प्रतिभावान अभिनेत्री असलेली सोभिता धुलिपाला ‘या’ कलेतही आहे पारंगत

एक यशस्वी मॉडेल आणि प्रतिभावान अभिनेत्री असलेली सोभिता धुलिपाला ‘या’ कलेतही आहे पारंगत

सोभिता धूलिपाला ही मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि यशस्वी मॉडेल आहे. सोभिताचा जन्म ३१ मे १९९२ रोजी आंध्रप्रदेशच्या तेनालीमध्ये झाला. तिचे संपूर्ण बालपण विशाखापट्टणममध्ये व्यतीत झाले. सोभिता मुख्यत्वे हिंदी, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते. आज (३१ मे) सोभिता तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. सोभिता धूलिपाला ही नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे आणि इमेजमुळे चर्चेत असते.

sobhita-dhulipala-birthday

सोभिता धूलिपालाला सुरुवातीपासूनच एक अभिनेत्री व्हायचे होते यासाठी तिने मुंबई गाठले. मुंबईत आल्यानंतर तिने वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली. अभिनेत्री आणि मॉडेल असलेली सोभिता भरतनाट्यम आणि कुचीपुडी या डान्स फॉर्ममध्ये प्रशिक्षित क्लासिकल डान्सर देखील आहे. तिने २०१३ साली मिस इंडिया अर्थचा किताब स्वतःच्या नावावर केला. यासोबतच ती एक सुपरमॉडेल आणि ब्युटी पेजेंट टायटलहोल्डर देखील आहे. २०१३ साली फिलिपिन्समध्ये झालेल्या मिस इंडिया अर्थमध्ये तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. मिस इको ब्युटी, मिस टॅलेंट आदी किताब जिंकणारी सोभिता २०१४ साली किंगफिशरच्या बिकिनी कॅलेंडरवर देखील झळकली.

सोभिताने अनुराग कश्यपच्या रमन-राघव 2.0 या चित्रपटातून बॉलिवूडच्या जगात पदार्पण केले. जुलै २०१६ साली तिने कश्यप प्रोडक्शन कंपनी असलेल्या फैंटॉम फिल्म्ससोबत तीन चित्रपटांचा करार केला. या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील दाखवण्यात आले. सोभिताला इथे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री क्रिटिक्स साठी नामांकन देखील देण्यात आले. त्यानंतर तिने ऑगस्ट २०१६ साली दोन सिनेमे साइन केले. अक्षत वर्मा दिग्दर्शित कालकांडी, राजा मेनन दिग्दर्शित ‘शेफ’ या चित्रपटांचा समावेश होता. मुख्य म्हणजे हे दोन्ही सिनेमे सैफ अली खानसोबतच तिने साइन केले. याशिवाय ती प्रसिद्ध वेबसिरीज ‘मेड इन हेवन’मध्ये देखील काम केले. लवकरच ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटात ऐश्वर्या रेसोबत काम करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा