अभिनेत्री हिना खान ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक नामांकित व्यक्तीमत्व आहे. बऱ्याच मालिकांमध्ये काम करून, तिने चाहत्यांच्या हृदयात आपली खास जागा बनवली आहे. शिवाय ती सोशल मीडियावर देखील आपल्या फॅशनचा जलवा दाखवत असते. अनेकदा पोस्टमुळे चर्चेत येणारी हिना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
हिना खान आणि रॉकी जैसवाल बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत असतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या हिनाच्या एका पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना संशय आला आहे. तिने तिच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टमध्ये ब्रेकअपचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा पाऊस पाडला आहे. त्यांनी अभिनेत्रीला विचारायला सुरुवात केली आहे की, तिचा ब्रेकअप झाला आहे का? दरम्यान अभिनेत्रीने ही पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. (social hina khan broke up with boyfriend rocky jaiswal actress started trending on twitter

ब्रेकअपच्या या पोस्टमुळे हिना खान सध्या ट्विटरवर ट्रेंड होऊ लागली आहे. युजर्स तिच्या ब्रेकअपबद्दल सतत ट्वीट करून विचारत आहेत. अभिनेत्रीच्या एका चाहत्याने ट्वीट करून विचारले की, तिचे रॉकीसोबत ब्रेकअप झाले आहे का? दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “अरे देवा, मला हिना खानबद्दल भीती वाटत आहे. त्यांच्या ब्रेकअपबाबत ट्वीट्स केले जात आहेत. हे काय होत आहे?”
Omg i m sh!t scarred now???????? HINA KHAN is trending and tweets are full of her breakup…. @eyehinakhan yeh kya hora hai ???????????? #HinaKhan pic.twitter.com/f1YqILMnbd
— ᴴⁱⁿᵃ ᴾᵉ ᶠᵃⁿᵃᵃ ???? (@hina_pe_fanaa) October 8, 2021
हिना खान बऱ्याच काळापासून रॉकीसोबत आहे. ती जेव्हा ‘बिग बॉस’मध्ये होती, तेव्हा रॉकी तिला सपोर्ट करण्यासाठी शोमध्ये पोहोचला होता. हिना आणि रॉकी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शो दरम्यान भेटले होते. या शोने हिनाला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. अक्षराच्या भूमिकेत प्रेक्षकांनी तिला खूप पसंत केले, तर रॉकी या शोचा पर्यवेक्षक निर्माता होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात
-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर
-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी