मराठी चित्रपटांच्या इतिहासात एक संपूर्ण काळ गाजवणारा अजरामर विनोदी अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या. आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना हसवणारा आणि त्याच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या या लक्ष्याची आज 16 वी पुण्यतिथी. त्याच निमित्ताने आपण लक्ष्याचे सुपरहिट असे टॉप 10 मराठी चित्रपट पाहूया.
धूमधडाका :
सन 1985 साली आलेल्या महेश कोठारे यांच्या ‘धुमधडाका’ या सिनेमात लक्ष्याने ‘लक्ष्या वाकडे’ ही भूमिका साकारली होती. चित्रपट बनवायची इच्छा असणारा लक्ष्या सतत कॅमेरा घेऊन फिरत असतो आणि आपल्या वडिलांकडे तो नेहमी चित्रपट बनवण्यासाठी पैसे मागत असतो. या सिनेमात लक्ष्यासोबतच महेश कोठारे, निवेदिता जोशी, प्रेमा किरण, सुरेखा, अशोक सराफ, शरद तळवलकर आदींच्या प्रमुख भूमिका होत्या.
दे दणादण :
सन 1987 साली आलेला हा सिनेमा जबरदस्त हिट झाला होता. लक्ष्याने या चित्रपटात लक्ष्या टांगमोडे ही व्यक्तिरेखा साकारली होती. यात लक्ष्याला हनुमाकडून एक सुपर शक्ती मिळते आणि लाल रंग बघितला की, निघून जाते. या सिनेमात लक्ष्मीकांत सोबत महेश कोठारे, निवेदिता जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अशी ही बनवाबनवी :
मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात हिट आणि सर्वच प्रेक्षकांचा ऑल टाईम फेव्हरेट चित्रपट म्हणून अशी ही बनवाबनवी चित्रपटाची ओळख आहे. या सिनेमात लक्ष्याने ‘परशुराम उर्फ परश्या उर्फ पार्वती’ स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन ने केले होते.
बाळाचे बाप ब्रह्मचारी :
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीचा धमाल विनोदी सिनेमा म्हणजे ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’. हे दोघे अविवाहित मित्र राहत असलेल्या घराबाहेर कोणीतरी एक लहान मूल ठेऊन जाते. बरच शोध घेतल्यानंतरही त्यांना त्या मुलाचे आई-वडील सापडत नाही. नाईलाजाने ते त्या मुलाचा सांभाळ करतात.
एक होता विदूषक :
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ह्या चित्रपटात लक्ष्याने आबूराव उर्फ सोंगाड्या ही एक गंभीर भूमिका साकारली होती. लोककला सादर करणाऱ्या कलाकारांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. जब्बार पटेल दिग्दर्शित या सिनेमाची पटकथा पु.ल.देशपांडे यांनी लिहली होती.
झपाटलेला :
ओम फट स्वाहा! आणि तात्या विंचू हे शब्द अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याचे कारण म्हणजे लक्ष्याचा सुपर डुपर हिट चित्रपट ‘झपाटलेला’. बोलक्या बाहुल्यांचा नाद असणाऱ्या लक्ष्याच्या हाती एक आत्मा असलेली बाहुली लागते आणि सिनेमा सुरु होतो.
थरथराट :
सन 1989 साली आलेल्या या सिनेमात लक्ष्याने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. आपल्या वृत्तपत्राचा खप वाढावा म्हणून लक्ष्या एका खोटी बातमी देतो. दुर्दैवाने ती बातमी खरी ठरते. या सिनेमात महेश कोठारे, प्रिया अरुण, निवेदिता सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहे.
एकापेक्षा एक :
सचिन आणि लक्ष्याने या सिनेमात अंध आणि बहिरा ही भूमिका साकारली होती. एका खुनाच्या खोट्या केस मध्ये ही दोघे अडकतात आणि त्यातून सुटण्यासाठी ते धडपड करतात अशी चित्रपटाची कथा आहे.
शेजारी शेजारी :
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, निशिगंधा वाद, वर्षा उसगांवकर यांची भूमिका असलेल्या या सिनेमात प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणि थोड्याच वेळासाठी नाटक करायला नवऱ्या बायकोची अदलाबदल केली जाते.
धडाकेबाज :
या सिनेमात लक्ष्याला एका जादूची बाटली मिळते. त्यात त्याला गंगाराम भेटतो. ती बाटली मिळवण्यासाठी काही गुंड लक्ष्या, महेश कोठारे आणि दिपक शिर्के यांच्या मागे लागतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘या’ चित्रपटात केले होते 1 रुपयात काम, वाचा संपूर्ण कहाणी
कान्ये वेस्टच्या वादामुळे अजून एक झटका; ‘आदिदास ब्रॅंडने तोडली भागीदारी’