Wednesday, July 2, 2025
Home कॅलेंडर संक्रांतीनिमित्त धनश्रीचे खास फोटोशूट, बेबी बंपसोबत दिसतेय अतिसुंदर

संक्रांतीनिमित्त धनश्रीचे खास फोटोशूट, बेबी बंपसोबत दिसतेय अतिसुंदर

‘तुझ्यात जीव रंगला’ या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगांवकर लवकरच आई होणार आहे. या मालिकेत धनश्रीने साकारलेल्या नंदिताच्या भूमिकेत अस्सल ग्रामीण ठसका सर्वाना पाहायला मिळाला. धनश्रीची भूमिका ग्रे शेडची असूनही तिने लोकांच्या मनात स्थान मिळवले.

धनश्री नेहमीच तिचे बेबी बंप सोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. नुकतेच तिने संक्रांत स्पेशल फोटोशूट करत त्यातील काही फोटो तिच्या अकाऊंटवरून शेअर केले आहे. संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे तिने काळा ड्रेस परिधान करत हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने वेस्टर्न लुक कॅरी केला असून ती यात लुकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंदसुद्धा आपण या फोटोंमध्ये पाहू शकतो.

धनश्रीने तिच्या पतीच्या वाढदिवशी म्हणजे १० ऑक्टोबर २०२०ला ती आई होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी तिने एक खूप सुंदर व्हिडिओ देखील तयार केला होता. धनश्रीने तिच्या डोहाळे जेवणाचे देखील फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते.

धनश्री तिच्या या काळात सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर धनश्री ऍक्टिव्ह आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमी स्वतःविषयी अपडेट्स आणि विविध फोटोज या माध्यमातून शेअर करत असते.

ध्रुवेश देशमुख हे तिच्या पतीचे नाव आहे. धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर २०१३ मध्ये तिने व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे अरेंज्ड मॅरेज झाले.

झी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रियालिटी शोमधून धनश्री घराघरांत पोहोचली. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मुळे धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकांमध्ये झळकली.

हे देखील वाचा