बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) बऱ्याचकाळानंतर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. डबल एक्सएल हा आगामी चित्रपट चाहत्यांना भेटीला येणार आहे या चित्रपटाद्वारे बॉडी शेमिंग या संबंधित समस्यांवर प्रकाश टाकणार आहे. यामध्ये सोनाक्षी सायरा खन्ना या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तर हुमा कुरेशी सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये नायिकांच्या मानधनाच्या भेदभावाविषयी मोठं विधान केलं आहे.
माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये, बॉडी शेमिंग, चित्रपटसृष्टीमधील भेदभाव अशा अनेक मुद्द्यांवर आपले मत माडलं. ती म्हणाली,” आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतं आहे. स्त्रींया प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. माझ्या मते, आज महिला करू शकत नाहीत असे कोणतेही काम उरलेलं नाही. आता महिला चंद्रावर जात आहेत, ती इंजिनियर बनते. आज ती तिला हवे ते करू शकते, त्यामुळे आपणही ती जुनी विचारसरणी बदलण्याची गरज आहे.”
बॉलिवूडमधील नायिकांच्या स्थितीबद्दल बोलली कि, सध्याच्या परिस्थितीत महिलाविषयक चित्रपटांच्या निर्मितीचे खूप प्रमाणही वाढलं आहे. आपल्या बॉलिवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामध्ये आधीपासून भेदभाव केलं जाते. त्यांच्या मानधनामधील फरक हे याचे सर्वात प्रमुख उदाहरण आहे.”
ती पुढे म्हणाली, अभिनेताच्या मानधनाच्या तुलनेमध्ये अभिनेत्रीला मिळणारे मानधन कमी असते. पुरुष आहे म्हणून त्याना जास्त मानधन मिळणार. पुरुष ते जे काम करतात, तेचं काम आम्ही पण करतो. कधी-कधी तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतो. तरीही आम्हांला तुलनेने कमी पैसे दिले जातात. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून होत आहेत. फक्त मनोरंजन विश्वच नाही, तर बऱ्याचशा ठिकाणी हा भेदभाव जाणवतो. पण आता परिस्थिती बदलणे गरजेचे आहे.” अशा भावना सोनाक्षीने व्यक्त केल्या आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
56 वर्षीय साऊथ अभिनेता करणार 33 वर्षांने लहान तरुणीशी लग्न; म्हणाला,’मी अजूनही मनाने तरुण…’
समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावानं दिलं पाठिंबा; म्हणाला,’तुला खूप सारं प्रेम…’