Monday, July 15, 2024

सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी खूप हावरट झालीये…

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) ही तिच्या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आली आहे. डबल एक्सएल चित्रपटाचे नाव असून या चित्रपटामध्ये हुमा कुरेशी(Huma Qureshi) देखील मुख्य भूमिकेत आहे. बॉडी शेमिंग सारख्या विषयावरील या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 4 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटलीला येणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर चित्रपट हिट व्हावा यासाठी दोघेही चित्रपटाचे सतत प्रमोशन करत आहेत. यासोबतच दोघेही त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल खूप काही शेअर करत आहेत.

या सगळ्याच्या दरम्यान सोनाक्षीची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. सोनाक्षी आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, मी आता खूप हावरट झाली आहे. मला खूप हाव सुटली आहे. सोनाक्षीनं अशा प्रकारे विधान करणं हे तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बाब होती. अभिनेत्रीने या चित्रपटासाठी स्वतामध्ये खूप काही बदल केले आहेत जे तिला अपेक्षित नव्हते. बऱ्याचदा आपण काही गोष्टींसाठी ऍडजस्टमेंट करतो मात्र एखादा विषय मनाला भावला तर त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार होतो. असे त्या पोस्टमधून सोनाक्षीने आपल्या नेटकऱ्यांना सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणते की, कोरोनामुळे आता प्रेक्षकांच्या आवडीनिवडीमध्ये देखील खूप फरक पडला आहे. कलाकारांना देखील सातत्याने आव्हानात्मक परिस्थितीमध्ये राहावे लागत आहे. ते साहजिकच आहे. कारण प्रेक्षक देखील कमालीचे सतर्क झाले आहेत.त्यामुळे मी आता चित्रपट आणि त्या चित्रपटातील भूमिका स्विकारण्यासाठी खूप हावरट झाली आहे. असे सोनाक्षीनं म्हटले आहे.

वृत्तानुसार सोनाक्षी म्हणाली की, “खर सांगू, माझ्यासाठी काहीही नाही. मी आरामात आहे, जर मला मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल असा एखादा चित्रपट असेल तर मी तो चित्रपट करेन.” ती पुढे म्हणाली, “मी मुळात माझ्या मनापासून काम करते. जसे मी माझ्या मनाने होय किंवा नाही म्हटले.. या आधारावर मी ते ऐकते आणि तेच करते आणि मी नेहमीच माझे चित्रपट निवडले आहेत.

मला वाटतं की आता फक्त एकच बदल घडू शकतो की मला ज्या भूमिका करायच्या आहेत त्या भूमिकांचा मला लोभ झाला आहे. त्यांना मला एका विशिष्ट मार्गाने किंवा मी यापूर्वी केलेल्या कामांपेक्षा खूप वेगळे आव्हान द्यावे लागेल. ही एक विचार प्रक्रिया आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे बाप! अभिनेत्री श्रिया सरनने दिवाळी पार्टीतच पतीला केलं किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

दिवाळी म्हटल्यावर कार्तिक आर्यन बघत असतो ‘या’ खास क्षणाची वाट, बालपणीच्या दिवसांचा केला खुलासा

हे देखील वाचा