मागच्या अडीच महिन्यांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्याविरोधात असंख्य शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा ही मागणी करत हे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर येऊन थांबले आहेत. या आंदोलनाची देशातील परदेशातील अनेक सेलिब्रेटींनी दाखल घेतली. काहींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तर काहींनी विरोध केला. बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच सोशल मीडियावर या आंदोलनाच्या समर्थनात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये सोनाक्षी शेतकऱ्यांना पाठिंबा देत एक अतिशय भावनिक कविता वाचत आहे. तिची ही कविता सोनाक्षीच्या फॅन्ससोबतच काही कलाकारांना देखील खूप आवडली आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स सुद्धा येत आहेत. सोनाक्षीने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, “नजर मिळवून स्वतःलाच विचार का, ही कविता त्या हातांना समर्पित करायला नको जे रोज आपले पोट भरत आहे.” अतिशय आशयपूर्ण असणारी ही कविता कवी वरद भटनागर यांनी लिहिली आहे.
सोनाक्षीने काही महिन्यांपूर्वीच तिचे ट्विटर अकाऊंट बंद केले. तेव्हापासून ती तिचे मत, विचार इंस्टाग्रामवर मांडत असते. फॅन्सला आणि नेटकऱ्यांना तिची ही पोस्ट खूप आवडत आहे. काही तासातच तिच्या या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न
-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ