Saturday, April 19, 2025
Home मराठी बीचसमोरील झोक्यावर झोके घेताना दिसली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; ‘मिनिमून’चे फोटो होतायेत व्हायरल

बीचसमोरील झोक्यावर झोके घेताना दिसली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; ‘मिनिमून’चे फोटो होतायेत व्हायरल

अचानकपणे दुबईत लग्न केल्यापासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खूप चर्चेत असते. लग्नाची बातमी देत तिने चाहत्यांना आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का सोबतच दिला होता. सोनाली ७ मे २०२१ रोजी, कुणाल बेनोडेकरसह रेशीमगाठीत अडकली आहे. या जोडप्याने दुबईमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकून घेतले. केवळ २ साक्षीदारांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाला त्यांच्या घरचे एकही सदस्य उपस्थित नव्हते. लग्नानंतर या जोडप्याचे सुंदर फोटो समोर आले होते.

अलीकडेच सोनाली पती कुणालसोबत पूर्व आफ्रिकेत फिरण्यासाठी गेली होती. तिथले बरचसे फोटो आणि व्हिडिओ ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना दिसते. नुकतेच तिने बीचवरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली बीचसमोरील एका झाडाला बांधलेल्या झोक्याला झोके घेताना दिसत आहे. सोनालीच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

यापूर्वीही तिने पूर्व आफ्रिकेत फिरतानाचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये अभिनेत्री निसर्गाच्या सुंदरतेचा लाभ घेताना दिसली. त्याठिकाणी सोनली पतीसोबत मजा मस्ती करत आहे. या जोडप्याचे एन्जॉय करतानाचे हे फोटो चाहत्यांकडूनही चांगलेच पसंत केले जात आहेत. कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी लॉकडाउन असताना देखील हे दोघे जग फिरत आहेत. शिवाय सोनालीने त्यांच्या या व्हॅकेशन ‘मिनिमून’ असे नाव दिले आहे. (sonalee kulakarni celebrating her minimoon see photos)

सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाली अखेरच्या वेळेस ‘युवा डान्सिंग क्वीन’ या टीव्ही शोमध्ये, नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्यसोबत जज म्हणून दिसली होती. ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

हे देखील वाचा