Saturday, March 15, 2025
Home मराठी पतीसोबत सोनाली कुलकर्णीने धरला ‘बुरूम बुरूम’ गाण्यावर ठेका, चाहता म्हणतोय, ‘दाजी जरा हळू’

पतीसोबत सोनाली कुलकर्णीने धरला ‘बुरूम बुरूम’ गाण्यावर ठेका, चाहता म्हणतोय, ‘दाजी जरा हळू’

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर तिचा पती कुणालसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. २०२१ मध्ये सोनालीने कुणालसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी तीन ते चार लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्न केले. त्यानंतर त्यांची रोमँटिक केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडते. सोशल मीडिया पोस्टवरून त्यांच्यातील प्रेम सगळ्यांना दिसते. अशातच सोनालीने कुणालसोबत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सोनाली आणि कुणाल फिरायला गेले आहेत. ते डोंगरांमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला सोनालीचा नुकतेच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पांडू’ मधील प्रसिद्ध गाणे ‘बुरुम बुरुम’ लागले आहे. या गाण्यावर कुणाल आणि सोनाली डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. (Sonalee Kulkarni share a dance video with her husband on social media post)

त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “खरचं हे खूप उत्स्फूर्त होते.” त्यांच्या या व्हिडिओ हे अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. गायक अवधूत गुप्ते याने कमेंट केली आहे की, “फुल टू बुरुम बुरूम.” तसेच बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “अहो दाजी हळूहळू, पाय घसरलं नाही तर.” अशा अनेक मजेशीर कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

सोनालीने २०२१ मध्ये एका मागून एक चित्रपटात काम करून धमाका केला आहे. खास म्हणजे तिचे हे चित्रपट सुपरहिट ठरले आहे. तिने ‘झिम्मा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘पांडू’ या चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच तिने ‘तमाशा लाईव्ह’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले होते. तसेच ती ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. त्यामुळे ती सध्या जोरदार चर्चेत आहे.

हेही वाचा :

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा

‘अंगात आलया’ गाण्यावर जॉनी लिव्हरने धरला मुलांसोबत ठेका, पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है 

 

हे देखील वाचा