यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. यातील मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही देखील लग्नबंधनात अडकली आहे. तिने कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्न केले आहे. लग्न झाल्यापासून हे जोडपे खूप चर्चेत आहे. सोनाली नेहमीच त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने कुणालसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळी टिकली लावली आहे. कानात मोठे इअरिंग घातले आहेत. कुणाल देखील खूप छान दिसत आहे. फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर दिसत आहे. (sonalee kulkarni share a photo with her husband on social media)
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “एकत्र ४ वर्षांचा प्रवास. जब वी मेट ऍनिव्हर्सरी १२.०९.२०१७.” ४ वर्षांपूर्वी जेव्हा कुणाल आणि सोनाली पहिल्यांदा भेटले होते, तेव्हाची ही आठवण सोनालीने शेअर केली आहे. तिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. अनेकजण फोटोवर कमेंट करत आहेत.
सोनाली आणि कुणालने अगदी साध्या पद्धतीने लंडनमध्ये लग्न केले आहे. त्यांनी केवळ त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न केले आहे.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट
-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक