Saturday, April 19, 2025
Home मराठी आईच्या वाढदिवसानिमित्त सोनाली कुलकर्णीने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा, अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल

आईच्या वाढदिवसानिमित्त सोनाली कुलकर्णीने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा, अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. २०२१मध्ये एका मागून एक चित्रपटात काम करून तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. कधी तिचा पती कुणालसोबत तर कधी तिचे ग्लॅमरस अंदाजात ती फोटो शेअर करत असते. अशातच तिने एका खास व्यक्तीसोबत फोटो शेअर केला आहे. रविवारी (२ जानेवारी) सोनालीच्या आईचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने तिच्या आईला शुभेच्छा देत एक खास फोटो शेअर केला आहे.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आई सोबत लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सोनाली अगदी लहान दिसत आहे. ती तिच्या आईच्या बाजूला उभी राहिली आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थ डे मम्मी.”

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. तिचे चाहते तसेच अनेक कलाकार देखील तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या फोटोवर हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव यांनी कमेंट करून सोनालीच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Sonalee Kulkarni share a photo with her mom on her birthday)

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.

यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतेच तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच ती ‘पांडू’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसली आहे.

हेही वाचा :

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सिरीज आणि चित्रपटांबद्दल घ्या जाणून

जेव्हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नायक आणि खलनायिका एकत्र येतात, तेव्हा घडते असे काही, पाहा हा व्हिडिओ

…म्हणून योगिता तिचे लाल रंगाचे कपडे कधीही घालते, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

 

हे देखील वाचा